महिलांमध्ये कोणत्या पेयामुळे होऊ शकतो लिव्हर कॅन्सर (फोटो सौजन्य - iStock)
सामान्यतः असे दिसून येते की महिला त्यांच्या आरोग्याबाबत सर्वात जास्त निष्काळजी असतात. त्यामुळे त्यांना कमी वयातच वेगवेगळे आजार जडलेले दिसून येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे महिलांमध्ये यकृताच्या कर्करोगाच्या जोखमीवर केलेले अभ्यास जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण सध्या महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. यानुसार, रजोनिवृत्तीनंतर ज्या महिला दररोज किमान एक साखरेचे पेय पितात किंवा सोडा पितात त्यांना यकृताचा कर्करोग होण्याचा धोका ७८% वाढतो असे अभ्यासातून आता समोर आले आहे.
२०२२ च्या न्यूट्रिशन लाईव्ह ऑनलाइन कार्यक्रमात सादर केलेल्या या अभ्यासात ९०,५०४ महिलांचा डेटा समाविष्ट होता. या महिलांचे वय ५० ते ७९ वर्षांच्या दरम्यान होते आणि हा अभ्यास सुमारे १८ वर्षे चालला. संशोधकांच्या मते, ज्या महिला दररोज एक किंवा अधिक साखर-गोड पेये पितात त्यांना यकृताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे
हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील पोषण विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. जुएहोंग झांग म्हणाले की, “आमच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की साखरेचे गोड पेये अथवा सोडा हे लिव्हर कॅन्सरसाठी धोकादायक घटक असू शकतात,” जर या संशोधनाचे निष्कर्ष सिद्ध झाले, तर गोड पेयांचे सेवन कमी केल्याने यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते असेही त्यांनी यादरम्यान सांगितले.
सोड्याचा जीवनशैलीशी संबंध
गोड पेयांचा कॅन्सरशी संबंध काय
हे संशोधन फक्त केवळ यातील एक संबंध दर्शवते, साखरयुक्त गोड पेये वा सोडा थेट यकृताच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात हे सिद्ध करत नाही. इतर संशोधकांनी अभ्यासाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, विशेषतः ज्या महिलांनी जास्त प्रमाणात मद्य सेवन केले त्यांच्या जीवनशैलीबद्दल. वरिष्ठ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट सामंथा हेलर यांनी प्रश्न विचारला, “या महिलांच्या आहारावर कमी फायबर, जास्त लाल आणि प्रक्रिया केलेले मांस, जंक आणि फास्ट फूड आणि कमी शारीरिक व्यायाम यासारख्या इतर घटकांचा प्रभाव पडतो का?”
महिलांमधील लिव्हर कॅन्सरची लक्षणे
लिव्हर कॅन्सरची कोणती लक्षणे महिलांमध्ये दिसतात (फोटो सौजन्य – iStock)
लिव्हर कॅन्सरची लक्षणे त्याच्या टप्प्यानुसार बदलू शकतात. याशिवाय महिलांमध्ये सुरूवातीची लक्षणे पहायची झाली तर पोटदुखी, कावीळ, पोटात सूज येणे, उजव्या खांद्यात वेदना होणे, यकृत वाढणे, उलट्या आणि मळमळ होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे, पांढरा मल येणे याच्याशी संबंधित आहेत. ही लक्षणे दिसत असतील तर कधीही त्याकडे दुर्लक्ष करू नये. महिलांनी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा
लिव्हर सडवतो हा गंभीर आजार, डोळ्यात पिवळेपणासह दिसतात अन्य लक्षण; करू नका दुर्लक्ष
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.