Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

Chocobar Ice Cream Recipe : लहानपणापासूनच चोकोबार आईस्क्रिम सर्वांचीच फेव्हरेट आहे. पण तुम्ही कधी या आईस्क्रिमला घरी बनवले आहे का? फक्त ५ साहित्यांपासूनच तुम्ही या आईस्क्रिमला घरी तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 03:42 PM
Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळा आणि आईस्क्रिमचे काॅम्बीनेशन म्हणजे सुखच सुख.
  • आपण चोकोबार आईस्क्रीम मार्केटमधून विकत घेऊन अनेकदा खाल्ली असेल.
  • चला ही आईस्क्रिम घरी बनवून पाहूया.
उन्हाळ्याच्या कडक उन्हाळा थंडगार आईस्क्रिम नेहमीच मनाला खुश करुन जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रिम खायला सर्वांनाच आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का? कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर न करता तुम्ही घरीच थंडगार आणि टेस्टी आईस्क्रिम तयार करु शकता. घरात बनवलेली ही आईस्क्रिम ताजी आणि चवीला आणखी मजेदार लागते. मुख्य म्हणेज यासाठी फार साहित्यांचीही गरज भासत नाही. तुम्ही फार निवडक साहित्यांपासून या रेसिपीला घरीच बनवू शकता.

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’

आता उन्हाळ्याच्या उकाड्यात काही थंड खायचं मन करत असेल आणि बाहेर जाण्याचा कंटाळा येत असेल तर घरीच बनवा चोकोबार आईस्क्रीम. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ही रेसिपी शेअर केली आहे. आज आपण या लेखात घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये चोकोबार आईस्क्रिम कशी तयार करायची याची स्टेप बाय स्टेप रेसिपी जाणून घेणार आहोत. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • १ कप ५५% डार्क चॉकलेट (बारीक चिरलेले)
  • १ मोठा चमचा खोबरेल तेल
  • १/२ कप बिनसाखरेची व्हिपिंग क्रीम
  • व्हॅनिला इसेन्स
  • १/४ कप कंडेन्स्ड मिल्क

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यावर एका वाटीत चॉकलेट ठेवून ती वितळवा.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात खोबरेल तेल देखील घालू शकता, यामुळे मऊपणा आणि चमक येते.
  • आता आईस्क्रिमचा आकार देण्यासाठी एक लहान कागदी ग्लास घ्या.
  • ग्लासात वितळवलेले चाॅकलेट ओता आणि व्यवस्थित याच्या कडांना चाॅकलेट पसरवून घ्या.
  • लक्षात घ्या तुम्हाला ग्लास भरायचा नाहीये फक्त याच्या कडा भरायच्या आहेत जेणेकरुन बाहेरची कडक चाॅकलेटची शीट तयार होईल.
  • तयार केलेले सर्व ग्लास फ्रीझरमध्ये ठेवा, जेणेकरून चॉकलेट व्यवस्थित घट्ट होऊन त्याचे थर तयार होतील.
  • आता शुगर फ्रि व्हिप्ड क्रीम एका भांड्यात घ्या आणि त्यात व्हॅनिला इसेन्स मिसळून फेटत राहा.
  • फेटलेल्या या क्रिममध्ये कंडेन्स्ड मिल्क घालून पुन्हा थोडे फेटून घ्या, जेणेकरून दोन्ही व्यवस्थित मिसळून जातील.
  • तयार मिश्रण चाॅकलेटची कोटींग केलेल्या कागदी ग्लासात भरा आणि सोनेरी फाॅईलने ग्लासला बंद करा.
  • आता या फाॅईलच्या मध्यभागी लहान चिर पाडून त्यात आईस्क्रीमच्या काड्या घाला. (बाजारात सहज उपलब्ध होईल)
  • तयार सर्व ग्लास फ्रिजरमध्ये किमान ५-६ तास गोठवण्यासाठी ठेवा.
  • आता, कपातील रिकामी जागा उरलेल्या वितळलेल्या चॉकलेटने भरा. हे लगेच घट्ट होईल.
  • आता तुम्ही कागदी कपाला कापून आतील गोठलेली आईस्क्रिम बाहेर काढू शकता.
  • तयार चाॅकलेट बार कुटुंबासोबत शेअर करा आणि याच्या चवीचा आनंद लुटा.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात ड्रायफ्रुट्सचे तुकडे देखील घालू शकता.
 

Web Title: Summer recipe how to make market style chocobar ice cream at home chef kunal recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Ice Cream Day
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
2

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी
3

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश
4

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.