Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उन्हाळ्यात तेलकट त्वचेची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल होईल कमी

चेहऱ्यावर जमा होणाऱ्या अतिरिक्त तेलामुळे त्वचेवर पिंपल्स आणि फोड येऊ लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या घरच्या घरी तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 14, 2025 | 09:53 AM
वाढत्या उन्हाळ्यात तेलकट त्वचेची 'या' पद्धतीने घ्या काळजी

वाढत्या उन्हाळ्यात तेलकट त्वचेची 'या' पद्धतीने घ्या काळजी

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात कधी ऊन तर कधी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्वचेमध्ये होणारे बदल, केसांसंबधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा अतिशय चिकट किंवा तेलकट होऊन जाते. यामुळे उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा तेलकट थरामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मोठं मोठे फोड येणे, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. चेहऱ्यावर असलेल्या ओपन पोर्समुळे त्यात अतिरिक्त घाण आणि धूळ माती तशीच साचून राहते. यामुळे चेहऱ्यावर अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

‘या’ लोकांनी चुकूनही करू नका हेअर ट्रान्सप्लांट, ट्रीटमेंटनंतर होऊ शकतो मृत्यू, वेळच व्हा सावध

चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे सिरम, स्किन केअर प्रॉडक्ट किंवा इतर अनेक गोष्टी चेहऱ्यावर लावतात. मात्र हे स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेला सूट न झाल्यामुळे चेहरा आणखीनच खराब होऊन जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेची कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल आणि चेहरा सुंदर उजळदार दिसू लागेल.

तेलकट त्वचेची कशा प्रकारे काळजी घ्यावी:

कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करणे:

उन्हाळा वाढल्यानंतर चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी चेहरा नेहमी कोमट पाण्याने स्वच्छ करावा. कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होईल. वाढलेले प्रदूषण आणि धूळ मातीपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करावा.

वारंवार त्वचा धुवू नये:

आपल्यातील अनेकांना चेहरा सतत धुवण्याची सवय असते. मात्र सतत चेहरा पाण्याने धुतल्यामुळे त्वचेमधील ओलावा कमी होतो आणि चेहरा रुक्ष, कोरडा दिसू लागतो. त्यामुळे दिवसभरातून दोनदाच चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. जास्त पाण्याने त्वचा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होऊ लागते.

वयाच्या तिशीमध्ये केस पांढरे झाले आहेत? केस काळे करण्यासाठी तीळाच्या तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, करून पहा सोपा उपाय

कमीत कमी मेकअप करावा:

सर्वच महिलांना नेहमीच मेकअप करण्याची सवय असते. मेकअप केल्यामुळे तुम्ही सुंदर आणि उठावदार दिसता. पण दिवसभर मेकअप करून राहिल्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी पडून जाते. त्यामुळे मेकअप केल्यानंतर तो योग्य वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. खोबऱ्याचे तेल, कोरफड जेल किंवा बाजारात मिळणाऱ्या स्किन ऑइलचा वापर करून मेकअप काढून घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Take care of oily skin in this way during growing summer skin care tips oily skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • Skin Care
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर
1

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार
2

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

उन्हामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम
3

उन्हामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम

बाजारातली थंड पेय पिणे कायमचे जाल विसरून! शरीर आतून थंड ठेवण्यासाठी घरीच बनवा पान-गुलकंद सरबत, नोट करा रेसिपी
4

बाजारातली थंड पेय पिणे कायमचे जाल विसरून! शरीर आतून थंड ठेवण्यासाठी घरीच बनवा पान-गुलकंद सरबत, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.