'या' लोकांनी चुकूनही करू नका हेअर ट्रान्सप्लांट
सुंदर दिसण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा सतत काहींना काही करत असतात. वाढलेले प्रदूषण, बिघडलेली जीवनशैली, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवरसुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात अनेक बदल होऊ लागतात. केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा, अचानक केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केस गळून पातळ झाल्यानंतर टक्कल पडेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बरेच लोक हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट करून घेतात. हल्ली हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटची मोठी क्रेझ सगळीकडे आली आहे. महिलांसह पुरुष देखील सुंदर आणि चमकदार केसांसाठी हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट करून घेतात. हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने केस येऊ लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर काही दिवसांमध्ये नवीन केस येण्यास सुरुवात होते. मात्र ही ट्रीटमेंट अतिशय खर्चिक असते, याशिवाय मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशीच एक घटना गोरखपूरमध्ये घडली आहे. गोरखपूरमध्ये राहणाऱ्या विनीत दुबेने काही दिवसांआधी एचबीटीआय कानपूरमधून पीएचडी पूर्ण केली होती. त्याने केलेल्या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीट्मेंमुळे त्याच्या चेहऱ्यावर सूज आली आणि शरीरात इन्फेक्शन वाढत गेले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र संपूर्ण शरीरात संसर्ग पसरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट करण्याचा विचार करत असाल तर पूर्णपणे विचार करूनच ही ट्रीटमेंट घ्यावी.
वारंवार केस गळून टक्कल पडल्यानंतर अनेक लोक हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतात. हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट केल्यानंतर काही दिवसांमध्येच डोक्यावर नवीन केस येऊ लागतात. हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट म्हणजे टक्कल पडलेल्या भागात प्लास्टिक किंवा त्वचारोगतज्ज्ञ सर्जन डोक्यावर अतिशय हेवी ट्रीटमेंट करतात. या प्रक्रियेमध्ये डोक्याच्या मागच्या किंवा बाजूच्या भागातील केस प्रत्यारोपण करत डोक्याच्या पुढच्या किंवा मागील बाजूला लावले जातात. हेअर ट्रान्सप्लांट करताना भूलचे इंजेक्शन सुद्धा दिले जाते.
हेअर ट्रान्सप्लांट करताना कोणत्याही चुकीच्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट करू नये. मान्यताप्राप्त आणि चांगल्या ठिकाणीच जाऊन हेअर ट्रान्सप्लांट करावे. केस प्रत्यारोपण करताना ती डॉक्टरांची करावी. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीकडून ट्रीटमेंट करून घेऊ नये. केस प्रत्यारोपण करताना योग्य माहिती आणि तंत्रज्ञांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.