पाकिस्तानच्या 'या' मुख्य शहरात भारतीय लष्कराने केला हल्ला; इथे आहे दहशतवादी संघटनांचे हेडकॉर्टर
२२ एप्रिल २०२५ रोजी भारताने आपल्या लष्करी क्षमतेचा ठसा उमटवत एक अत्यंत निर्णायक आणि संगठित कारवाई पार पाडली. “ऑपरेशन सिंदूर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कारवाईत भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यांचा सक्रिय सहभाग होता. पहाटे १:२८ ते १:३२ या अवघ्या चार मिनिटांच्या अवधीत भारताने पाकिस्तानातील विविध दहशतवादी अड्ड्यांवर ९ अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी लक्ष केले. ही कारवाई म्हणजे २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार प्रत्युत्तर होती.
“Operation Sindoor ” नंतर पाकिस्तानची बौखललेली प्रतिक्रिया; LoCवर फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू
या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या नियंत्रणातील अनेक भागांवर निशाणा साधण्यात आला, विशेषतः पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (पीओके)मधील मुझफ्फराबाद, कोटली, मुद्रिके आणि बहावलपूर या शहरांमधील दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली. माहितीनुसार, या हल्ल्यात ३० हुन अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले आहे. यासहच या ऑपेरेशनद्वारे अनेक दहशतवादी तळ देखील उद्ध्वस्त करण्यात आली असल्याची माहिती आहे.
पाकिस्तानच्या या ठिकाणी आहे दहशतवादी संघटनांचे तळ
मुझफ्फराबाद हे पीओकेचे प्रशासकीय मुख्यालय असून, झेलम आणि किशनगंगा (पाकिस्तानमध्ये नीलम म्हणून ओळखली जाते) नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या शहराच्या भौगोलिक स्थितीमुळे ते दहशतवादी संघटनांसाठी एक रणनीतिकदृष्ट्या उपयुक्त केंद्र ठरले आहे. येथे हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांची प्रशिक्षित केंद्रे आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हिजबुल मुजाहिदीन ही एक इस्लामिक दहशतवादी संघटना आहे जी, १९८९ मध्ये मोहम्मद एहसान दार, हिलाल अहमद आणि मसूद सरफराज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. पुढे या संघटनेचा जमात-ए-इस्लामी काश्मीरशी संबंध वाढला. सध्या या संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आहे, ज्याच्यावर भारतात दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. ईडीने २०२० मध्ये त्याच्याविरुद्ध समन्स बजावले होते.
मुझफ्फराबाद व्यतिरिक्त, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने बहावलपूरमधील दहशतवादी मसूद अझहरचे अड्डे देखील उद्ध्वस्त केले. बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याचे मूळ शहर आहे. या शहरात जैशचे (पाकिस्तानमधील सक्रिय इस्लामी दहशतवादी गट) अनेक अड्डे असल्याचे गुप्तचर अहवालांनी अधोरेखित केले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये या अड्ड्यांवरही प्रमुख लक्ष ठेवून त्यांवर हल्ला करण्यात आला.
लष्करी संयोजन आणि धाडसी निर्णय
ऑपरेशन सिंदूर हे केवळ एका पथकाने नव्हे, तर भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांनी – थलसेना, नौदल आणि वायुसेना – यांच्यातील उच्चस्तरीय समन्वयाने राबवले गेलेले ऑपरेशन आहे. अशा प्रकारचा एकात्मिक लष्करी प्रतिहल्ला भारताच्या संरक्षण धोरणातील प्रगतता आणि तयारी यांचे प्रतीक मानले जाते. या कारवाईसाठी सर्जिकल स्ट्राइक प्रकारची रणनीती वापरण्यात आली, ज्यामुळे भारताने पाकिस्तानच्या अंतर्गत भागांमध्येही अचूकपणे कारवाई केली. ही कारवाई जागतिक व्यासपीठावर भारत आपल्यावरील कोणतीही दहशतवादी कारवाई सहन करणार नाही आणि त्याचे उत्तर वेळेवर, ठोस आणि प्रभावी पद्धतीने देईल, असा संदेश देणारी ठरली.
ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर ती भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाची पुनर्स्थापना करणारी एक प्रमुख घटना ठरली. या हल्ल्याने दहशतवादी संघटनांचे मनोबल खचवले. शिवाय भविष्यात अशा कारवायांना अटकाव घालण्याचा संदेश देखील दिला. अशा प्रकारची ठोस कारवाई ही केवळ सुरक्षा नव्हे, तर राजकीय आणि रणनीतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की तो केवळ प्रतिक्रियावादी राष्ट्र नाही, तर गरज भासल्यास प्रचंड क्षमतेने आणि धाडसाने कृती करणारे राष्ट्र देखील आहे.