loc ( फोटो सौजन्य: social media)
Operation Sindoor: भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्य्याचा बदल घेला आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदुर’द्वारे जशास तसा बदला घेतला आहे. बुधवारी रात्री 1.30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. थेट एअर स्ट्राइक केला. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत.
Operation Sindoor: भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अजहर मारले गेले का?
पहलगाम येथे हल्ला झाला होता या हल्ल्यात २६ पर्यटक शहिद झाले होते. त्यानंतर भारताने अनेक मोठे निर्णय घेतले होते. आता भारताने या हल्ल्याचा चोक प्रत्युत्तर दिलं आहे. याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. भारताच्या या मोठ्या ऑपरेशननंतर पाकिस्तानला मोठी धडकी भरली आहे. पाकिस्तानने देखील LOC वर फायरिंग केली. ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू धाला आहे. पाकिस्तानी मोर्टार शेलिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी केली आहे. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचेही मोठं नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात येणार आहेत. सततच्या गोळीबारामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि अनेकांनी भूमिगत बंकरमध्ये आसरा घेतला आहे.
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा (LOC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्री उशिरा तोफखान्याचा वापर करत मोठा गोळीबार करण्यात आला. यामध्ये तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एका महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.
याआधीही पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्याने युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारतीय लष्कराने तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अनेक भागात गोळीबार केला.
पुंछ-राजौरीच्या भिंबर स्ट्रीट आणि कुपवाडा जिल्ह्यातील कर्नह सेक्टरमध्येही पाकिस्तानने पुन्हा गोळीबार सुरू केला आहे. त्यामुळे सीमेवरील नागरिकांना सतत जीव मुठीत धरून राहावं लागत आहे. लोक घाबरले आहेत आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते भूमिगत बंकरमध्ये लपले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून करण्यात आलेली कारवाई ही पाकिस्तानसाठी धडा देणारी ठरली आहे. मात्र, पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नसल्यामुळे सीमेवरचा तणाव अधिकच गडद झाला आहे.
Operation Sindoor: भारताचा पराक्रम! पाकिस्तानात 100 KM आत घुसून मारलं; कोणते 9 तळ केले उद्धवस्त ?