Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ख्रिसमसचे प्रतीक ठरलेले ‘जिंगल बेल्स’ मूळात वेगळ्याच सणासाठी लिहिले गेले होते, जाणून घ्या अनोखी कथा 

ख्रिसमसची ओळख बनलेले ‘जिंगल बेल्स’ हे गाणे प्रत्यक्षात ख्रिसमससाठी लिहिलेले नव्हते. थँक्सगिव्हिंगपासून अंतरिक्षापर्यंत पोहोचलेली या गाण्याची कथा खूपच रंजक आहे. 

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 24, 2025 | 08:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • जिंगल बेल्स’ मूळात ख्रिसमस नसून एका वेगळ्याच कार्यक्रमासाठी बनवण्यात आले होते
  • 1857 साली हे गाणे ‘वन हॉर्स ओपन स्ले’ या नावाने प्रसिद्ध झाले, नंतर ते जगप्रसिद्ध ‘जिंगल बेल्स’ बनले.
  • याजे जगभर ख्रिसमसनिमित्त हे गाण मोठ्या आवडीने वाजवले जाते पण याचा इतिहास काही वेगळाच सांगतो.
ख्रिसमस हा सण जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्मातील हा अत्यंत महत्त्वाचा सण प्रभु येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या आनंदोत्सवासाठी साजरा केला जातो. या काळात बाजारपेठा रोषणाईने उजळून निघतात, घराघरांत सजावट केली जाते आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण होते. मात्र या सगळ्यांपेक्षा ख्रिसमसची खरी ओळख एका खास सुरावटीमुळे तयार होते. ती म्हणजे जगप्रसिद्ध गाणे ‘जिंगल बेल्स’. आज ख्रिसमस म्हटले की ‘जिंगल बेल्स’ आपोआप आठवते. पण आश्चर्याची बाब म्हणजे हे गाणे मूळात ख्रिसमससाठी लिहिलेच गेले नव्हते. या गाण्याच्या मागे एक रंजक आणि वेगळीच कथा दडलेली आहे.

Fast Food खाण्याने 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, सेवन किती धोकादायक आणि कोणत्या आजारांचा पडतो विळखा

गाण्याचा लेखक कोण?

‘जिंगल बेल्स’ हे गाणे अमेरिकन संगीतकार जेम्स लॉर्ड पियरपाँट यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले. विशेष म्हणजे जेम्स हे प्रसिद्ध उद्योगपती आणि फायनान्सर जे. पी. मॉर्गन यांचे मामा होते. पियरपाँट कुटुंब बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असले तरी जेम्स यांनी संगीताच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

ख्रिसमससाठी नव्हे, तर वेगळ्याच कारणासाठी

लहानपणापासून हे गाणे आपण ख्रिसमसशी जोडत आलो असलो, तरी प्रत्यक्षात हे गाणे थँक्सगिव्हिंग या सणाच्या निमित्ताने एका चर्चमधील कार्यक्रमासाठी सादर करण्यात आले होते. या गाण्याच्या शब्दांमध्ये कुठेही ‘ख्रिसमस’ किंवा कोणत्याही धार्मिक सणाचा उल्लेख नाही, हे लक्षात घेतले तर ही बाब अधिक स्पष्ट होते. संशोधकांच्या मते, 1857 मध्ये प्रकाशित झाल्यानंतर अनेक वर्षांनी हे गाणे हळूहळू ख्रिसमस साजरीकरणाचा अविभाज्य भाग बनले.

अंतरिक्षात वाजलेले पहिले गाणे

‘जिंगल बेल्स’च्या नावावर एक अनोखा विक्रमही नोंदवला गेला आहे. हे गाणे अंतरिक्षातून वाजवले गेलेले जगातील पहिले गाणे ठरले. ‘जेमिनी 6’ या मोहिमेतील अंतराळवीरांनी कंट्रोल रूमशी संवाद साधताना अचानक हार्मोनिका आणि छोट्या घंट्यांच्या मदतीने ‘जिंगल बेल्स’ची धून वाजवली होती. आजही त्या घंट्या आणि हार्मोनिका स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममध्ये जतन करून ठेवल्या आहेत.

थंडीमुळे सांधे होतायत कडक? हिवाळ्यामध्ये ‘हे’ आरोग्य मंत्र तुमच्या हाडांची – सांध्यांची घेतील काळजी

नावामागील रंजक कथा

आज सर्वत्र ओळखले जाणारे ‘जिंगल बेल्स’ हे नाव सुरुवातीपासून नव्हते. 1857 साली जेव्हा हे गाणे प्रथम प्रकाशित झाले, तेव्हा त्याचे नाव “वन हॉर्स ओपन स्ले” असे होते. दोन वर्षांनंतर म्हणजेच 1859 मध्ये गाणे पुन्हा प्रसिद्ध झाले आणि त्यावेळी त्याला ‘जिंगल बेल्स’ हे नाव देण्यात आले. आज हे गाणे ख्रिसमसचा आत्मा बनले असले, तरी त्याची मूळ कहाणी जाणून घेतल्यावर त्यामागील इतिहास अधिकच रंजक वाटतो.

 

Web Title: The song jingle bells which has become a symbol of christmas was originally written for a different occasion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 08:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.