
आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी घटक एका झटक्यात पडून जातील बाहेर! नियमित करा 'या' फळाचे सेवन
पपई खाण्याचे फायदे?
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी उपाय?
सकाळच्या नाश्त्यात कोणते फळ खावे?
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. व्यायाम, योगासने, ध्यान तर काहींना डिटॉक्स पेय पिण्याची सवय असते. पण उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस खराब होतो. कारण पोटात जाणवणाऱ्या जडपणामुळे मूड पूर्णपणे बिघडतो. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या वाढून आरोग्य बिघडून जाते. रात्रीच्या वेळी शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यात चिकन, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होत नाहीत. त्यामुळे आहारात कायमच हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास पचनाच्या बऱ्याच समस्या उद्भवून आरोग्य बिघडून जाते. (फोटो सौजन्य – istock)
वारंवार होणाऱ्या ऍसिडिटीमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात कायमच हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या फळाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळाच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. उपाशीपोटी पपईचे सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि संपूर्ण बॉडी डिटॉक्स होईल.
उपाशी पोटी कोणत्याही फळाचे सेवन केल्यास शरीर त्यातील पोषक घटक सहज शोषून घेतो. त्यामुळे फळांचे सेवन उपाशी पोटी करावे. गोड चवीचा पपई सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप जास्त आवडतो. यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाइम्स आणि जीवनसत्त्वे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. याशिवाय पपईमध्ये असलेले मेटाबॉलिझम सक्रिय होण्यास मदत होते. पपई खाल्ल्यामुळे पोटाच्या जुनाट समस्या दूर होतात. पपई खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
पपईमध्ये असलेले पपेन नावाचे प्रभावी एन्झाइम, शरीरातील प्रोटीन सहज पचन करतात. यामुळे पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव येत नाही. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. पपईमध्ये असलेल्या फायबर आणि भरपूर फायबरमुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. तसेच वर्षानुवर्षे बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित पपई खाल्ल्यास आठवडाभरात संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. पोट स्वच्छ करण्यासाठी आणि दिवसभर फ्रेश राहण्यासाठी पपईचे सेवन करावे.
पिकलेल्या पपईमध्ये विटामिन सी भरपूर असते. यामुळे शरीरात कोलेजन निर्मिती होण्यास मदत होते. तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी पपईचे सेवन करावे. चेहऱ्यावर वाढलेला लालसरपणा कमी करण्यासाठी पपई खावी. सकाळच्या नाश्त्यात पपईची सेवन केल्यास त्वचेच्या पेशींना आतून पोषण मिळते आणि काळे डाग कमी होण्यास मदत होतात. याशिवाय वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी वाटीभर पपई खावी. पपईतील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
Ans: जेव्हा मोठ्या आतड्यातून (colon) मल खूप हळू सरकतो, तेव्हा शरीर त्यातील पाणी जास्त शोषून घेते, ज्यामुळे मल कठीण, कोरडा आणि बाहेर टाकण्यास त्रासदायक होतो.
Ans: आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास होणे.
Ans: दिवसभर भरपूर पाणी आणि इतर द्रवपदार्थ प्या.