Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवत असेल तर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी किंवा लिंबाचा रस प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 08:36 AM
सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us
Close
Follow Us:

आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी काय खावे?
पचनक्रिया बिघडण्याची कारणे?

दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. पण आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर पडून न गेल्यास पोट फुगल्यासारखे वाटते. याशिवाय पचनाच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. ऍसिडिटी, मळमळ, उलट्या, डोकेदुखी इत्यादी बरीच लक्षणे दिसून येतात. आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित शरीर स्वच्छ होणे आवश्यक आहे. पोट व्यवस्थित साफ न झाल्यास शरीरात जडपणा जाणवू लागतो. बिघडलेली पचनक्रिया वारंवार शरीरावर नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आहारात सतत होणारे बदल, व्यवस्थित झोप न होणे, रात्री कधीही जेवणे, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ आतड्यांमध्ये कुजलेला मलमऊ होऊन सहज बाहेर पडून जातो. यामुळे पचनक्रिया सुधारते. सकाळी पोट साफ होण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांचा आहारात समावेश करावा.

बडीशेपचे पाणी:

सकाळी उठल्यानंतर जर पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर बडीशेपचे पाणी प्यावे. बडीशेपमध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात. यासाठी पाणी गरम करून त्यात बडीशेप टाकावी आणि उकळवून घ्या. तयार केलेले पाणी थंड झाल्यानंतर उपाशी पोटी सेवन करा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास पचनाच्या समस्या कधीच उद्भवणार नाहीत.

लिंबू पाणी:

वाढलेले वजन कमी करण्यापासून ते अगदी पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा लिंबाच्या रसाचे सेवन केले जाते. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. तब्येत चांगली ठेवण्यासाठी लिंबाच्या रसाचे सेवन केले जाते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून जातात आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते.

अंथरुणावर पडल्यानंतर लागेल शांत झोप! नियमित करा ‘ही’ योगासने, शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल

फायबरयुक्त पदार्थ:

दैनंदिन आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबर असलेले पदार्थ शरीरातील घाण बाहेर पडून जाते. उपाशी पोटी सकाळच्या नाश्त्यात पपई, पेरू किंवा इतर वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीर स्वच्छ होते. कायम हेल्दी राहण्यासाठी फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: खराब आतड्याच्या आरोग्याची लक्षणे कोणती?

    Ans: सतत पोटाच्या समस्या (गॅस, बद्धकोष्ठता, डायरिया), थकवा, त्वचेवर पुरळ उठणे, गोड खाण्याची तीव्र इच्छा

  • Que: आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?

    Ans: दही, ताक, लोणचे, इडली-डोसा, केळी, सफरचंद, पालक, गाजर आणि बेरी

  • Que: पोट आणि मेंदूचा काय संबंध आहे?

    Ans: आतडे आणि मेंदू यांचा थेट संबंध असतो, ज्यामुळे भावनांचा पोटावर परिणाम होतो. ताणतणावामुळे पोटाचे आरोग्य बिघडू शकते।

Web Title: Constant rumbling in the stomach after waking up in the morning follow these simple tips to get relief from indigestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • gut health
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो
1

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

अंथरुणावर पडल्यानंतर लागेल शांत झोप! नियमित करा ‘ही’ योगासने, शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल
2

अंथरुणावर पडल्यानंतर लागेल शांत झोप! नियमित करा ‘ही’ योगासने, शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल

White Discharge मुळे सतत पाठ- कंबर दुखत राहते? मग आहारात करा ‘या’ घरगुती पदार्थांचा समावेश, अशक्तपणा होईल कमी
3

White Discharge मुळे सतत पाठ- कंबर दुखत राहते? मग आहारात करा ‘या’ घरगुती पदार्थांचा समावेश, अशक्तपणा होईल कमी

वर्षानुवर्षे आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध खराब का होत नाही? जाणून घ्या यामागील आश्चर्यकारक कारणे
4

वर्षानुवर्षे आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध खराब का होत नाही? जाणून घ्या यामागील आश्चर्यकारक कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.