डर्मेटॉलॉजीमध्ये AI चा वापर योग्य की अयोग्य (फोटो सौजन्य - iStock)
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा वापर आता डर्मेटोलॅाजी क्षेत्रामध्येही वाढू लागला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन निदान आणि प्रत्यक्षात केले जाणारे निदान यात मोठा फरक असून AI तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याऐवजी डॉक्टरांवर विश्वास ठेवणे योग्य राहील.
हल्ली अनेक मोबाइल अॅप्स असा दावा करतात की ते तुमच्या त्वचेचा फोटो स्कॅन करू शकतात आणि ते मुरुम, एक्जिमा, रंगद्रव्य, त्वचेचा कर्करोग किंवा इतर कोणतीही समस्या आहे का हे देखील त्वरित सांगू शकतात. ही पध्दत आपल्याला सोयीस्कर वाटत असला तरी, अचूक निदानासाठी या अॅप्सवर अवलंबून राहू नका तसेच याचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. बरेचजण आता त्वचेच्या समस्यांकरिता त्वचारोगतज्ज्ञांना भेट देण्याऐवजी या अॅप्सची मदत घेताना दिसून येत आहेत, जे चूकीचे असून एखाद्याच्या त्वचेचे नुकसान देखील करु शकते. डॉ. शरीफा चौसे, त्वचारोगतज्ज्ञ, मुंबई यांनी अधिक माहिती आपल्याला दिली आहे.
शॉपिंग सोबत आता डॉक्टरांचा सल्लासुद्धा मिळणार, Amazon Clinic सर्विस भरतात लाँच!
त्वचेसंबंधित समस्यांच्या ॲानलाईन निदानाचे धोके
डर्मेटॉलॉजिस्टची गरज
त्वचारोगतज्ज्ञ केवळ तुमच्या त्वचेची समस्या न पाहता तुमचा वैद्यकीय इतिहासदेखील जाणून घेतात. कोणत्याही समस्येचे निदान करण्यापूर्वी आणि उपचारांचा सल्ला देण्यापूर्वी तो ते तुमची जीवनशैली, तुमच्या सवयी आणि इतर आरोग्य समस्यांबाबत चर्चा करतात, त्या जाणून घेतात व त्याविषयी नोंद ठेवतात. डॉक्टर वारंवार होणाऱ्या त्वचेच्या समस्यांमागील लपलेली कारणे देखील ओळखू शकतात आणि सुरक्षित आणि प्रभावी उपचार सुचवू शकतात.
योग्य काळजी घेऊन त्वचेच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांची सुरुवातीची चिन्हे शोधून काढतात. केवळ AI किंवा ऑनलाइन टूल्सवर अवलंबून राहिल्याने चुकीचे निदान, चुकीच्या औषधांचे सेवन आणि त्वचेचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. ऑनलाइन स्किन ॲप्स त्वचारोगतज्ज्ञांची जागा घेऊ शकतात ही एक निव्वळ गैरसमज आहे. केवळ ॲप्सवर अवलंबून राहिल्याने योग्य उपचारांना विलंब होऊ शकतो आणि त्वचेच्या समस्या आणखी वाढू शकतात ही वास्तविकता असून प्रत्येकाने याचे भान राखले पाहिजे.
App हे पर्याय नाहीत
स्किन ॲप्स हे वैद्यकीय सेवेला पर्याय नाहीत. कोणतीही नवीन क्रीम, औषध किंवा अगदी उपचार करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून काहीही करून पाहू नका किंवा सोशल मीडियावर फॉरवर्ड केलेल्या कोणत्याही पोस्टचे अनुसरण करू नका. जर एखाद्या ॲपने गंभीर स्थिती दर्शविली तर त्यावर आंधळा विशंवास न ठेवता डॉक्टरांना भेटा.
संतुलित आहार, योग्य हायड्रेशन, सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण आणि तणावाचे व्यवस्थापन यासारख्या चांगल्या सवयींचे पालन करा. AI आधारित ॲप्स आधुनिक आणि उपयुक्त दिसले तरी ते वैद्यकीय सल्ल्यास पर्याय नाहीत हे जाणून घ्या. तंत्रज्ञानाने जागरूकता वाढवविता येते, परंतु तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे हे विसरु नका. केवळ ॲप्सवर अवलंबून राहू नका. त्वचारोगतज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करा.