पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
पावसाळा ऋतू खूप रोमँटिक वाटतो, पण तो आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी नक्कीच आव्हानात्मक असतो. खरंतर, या ऋतूमध्ये ओलावा आणि घाण सौंदर्य हिरावून घेते. डर्मेटोलॉजी जर्नल आणि WHO च्या अहवालानुसार, पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण ३५-४०% वाढते. पायांचे संसर्ग ५०% वाढतात, तर ओले कपडे किंवा शूज घालणाऱ्यांमध्ये त्वचेच्या संसर्गाचा धोका ३ पट वाढतो आणि मुलांमध्ये त्वचेच्या अॅलर्जी २५% वाढतात, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे बॅक्टेरियाचा संसर्ग म्हणजेच मुरुम, पुरळ, त्वचेची अॅलर्जी, खाज सुटण्याची समस्या हे आहेत.
आल्हाददायक पावसाळा चेहऱ्यासोबतच केसांची चमकही घालवतो आणि यात कोणाचंही दुमत नसेल. या ऋतूमध्ये केसांचा संसर्ग, चिकटपणा, कोरडी टाळू आणि कोंडा या समस्या वाढतात. अशा परिस्थितीत, बाबा रामदेव यांनी चांगल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी काही उत्तम टिप्स सांगितल्या आहेत. चला जाणून घेऊया या ऋतूमध्ये तुमच्या केसांची आणि
त्वचेची काळजी कोणत्या पद्धतीने घ्यावी
पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात ओलावा आणि घाणीमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये मुरुमे, एक्जिमा, बुरशीजन्य संसर्ग ज्याला फंगल इन्फेक्शन म्हटले जाते, खाज सुटणे, काळी वर्तुळे निर्माण होणे, अंगारव ठिपके येणे, डाग पडणे, मुरुमांचा त्रास आणि अॅलर्जी यांचा समावेश आहे.
चेहरा चमकण्यासाठी काय करावे
पावसाळ्यात तुमच्या त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितले की, तुमचा आहार चांगला आणि हेल्दी असायला हवा.यासाठी तुम्ही सकाळी कोरफडचा ताजा रस प्या. या रसामुळे त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होते. संतुलित आहार घ्या आणि तळलेले पदार्थ आणि अति मसाले खाणे टाळा. नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी दररोज योगासने आणि प्राणायामदेखील करा. पावसात भिजल्यानंतर लगेच त्वचा कोरडी करा. हलके, सुती कपडे घाला आणि अँटीफंगल पावडर वापरा.
अंघोळ केल्यानंतर किती वेळा फॉलो करावे स्किन केअर रुटीन? त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स
केसगळती का होते?
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यामागे ताण, हार्मोनल बदल, कोंडा, बुरशीजन्य संसर्ग, अलोपेसिया, अशक्तपणा, हार्मोनल असंतुलन, प्रथिनांची कमतरता आणि व्हिटॅमिनची कमतरता अशी अनेक कारणे असू शकतात. या गंभीर कारणांमुळे केस गळण्याची समस्या वेगाने वाढते.
केस कसे मजबूत होतील
केस मजबूत करण्यासाठी, त्यांची योग्यरित्या देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. मजबूत केसांसाठी, दररोज शाम्पू करणे टाळा, आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवा. केस धुण्यापूर्वी दीड ते दोन तास आधी तेल लावा. केस धुतल्यानंतर टॉवेलने केस घासू नका. केसांवर रसायने वापरू नका. केसांवर शक्य तितके कमी उष्णता साधने वापरा किंवा अजिबात वापरू नका. तसेच, पावसाच्या पाण्यापासून केसांचे रक्षण करा.
‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी! कधीच उद्भवणार नाही केसांसंबधित समस्या, केसांची होईल झपाट्याने वाढ
१. पावसाळ्यात कोणत्या समस्या होतात?
पावसाळ्यात सर्दी-ताप-खोकल्यासह त्वचा आणि केसांच्या समस्या अधिक प्रमाणात झालेल्या दिसून येतात
२. केसगळतीची कारणे काय आहेत?
हार्मोनल असंतुलन, ताण, तणाव, सतत कोंडा, फंगल इन्फेक्शनसारखी अनेक कारणं केसगळतीसाठी कारणीभूत ठरतात
३. त्वचा पावसाळ्यात का खराब होते?
सतत त्वचा ओली राहते आणि फंगल इन्फेक्शन वा अॅलर्जी झाल्याने त्वचा पटकन खराब होते