शॉपिंग सोबत आता डॉक्टरांचा सल्लासुद्धा मिळणार, Amazon Clinic सर्विस भरतात लाँच!
Amazon India ने भारतात Amazon Clinic नावाची नवीन सेवा सर्विस केली आहे. याद्वारे युजर्सना घरबसल्या डॉक्टरांकडून त्यांच्या समस्यांचे निराकरण ऑनलाइन करून घेता येणार आहे. या ऑनलाइन Amazon साठी रूग्णांना 299 ते 799 रुपयांपर्यंत फिज भरावी लागणार आहे. Amazon Clinic मार्फत रुग्णांना 50 हून अधिक आरोग्य परिस्थितींसाठी ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे.
हेदेखील वाचा- itel S25 सीरीजची अफोर्डेबल प्राइजमध्ये एंट्री, 50MP मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज
Amazon Clinique लाँच केल्यानंतर, Amazon आता प्रॅक्टो, मेडीबडी, 1mg ऑनलाइन कंसल्टेशन आणि इतर टेलिहेल्थ प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करणार आहे. Amazon ची ही नवीन सेवा युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाईन शॉपिंगसोबतच आता Amazon युजर्सना डॉक्टरचा सल्ला घेण्याची संधी देखील मिळणार आहे. Amazon Clinic सर्विस भारतातील Amazon युजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Amazon Clinic सध्या केवळ एक्सक्लूसिव Amazon Android ॲपवर उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या iOS युजर्सना Amazon Clinic सर्विसचा लाभ घेता येणार नाही. परंतु ही सर्विस लवकरच iOS वर देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
Amazon Clinic मध्ये रुग्णांना डर्मेटोलॉजी, स्त्रीरोग, बालरोग, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, कार्डिओलॉजी, एंडोक्राइनोलॉजी, मानसोपचार, ऑर्थोपेडिक्स यासह विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचा रुग्णांना सल्ला घेता येणार आहे. क्लिनिकमधील कंसल्टेशन शुल्क 299 रुपयांपासून सुरू होते आणि तज्ञांच्या आधारावर 799 रुपयांपर्यंत जाते.
तुम्ही विशिष्ट स्लॉटसाठी ऑनलाइन कंसल्टेशन बुक करू शकता. ऑनलाइन कंसल्टेशनमध्ये व्हिडिओ, ऑडिओ आणि चॅट सपोर्ट समाविष्ट आहे आणि अनलिमिटेड सात-दिवस विनामूल्य फॉलो-अप समाविष्ट आहेत. ॲमेझॉनने सांगितले की, कंसल्टेशन सामान्यत: 10 ते 30 मिनिटांपर्यंत आरोग्य समस्येवर अवलंबून असते.
हेदेखील वाचा- व्हॉट्सॲप करणार फॅक्ट चेक, ओळखणार खरे – खोटे फोटो! लवकरच येणार नवीन फीचर
Amazon Clinic सध्या केवळ एक्सक्लूसिव Amazon Android ॲपवर उपलब्ध आहे आणि लवकरच iOS ॲपवर उपलब्ध होईल. तथापि, ते PC द्वारे उपलब्ध नाही.