हृदयाच्या नसा होतील क्षणार्धात स्वच्छ! खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश
चुकीचा आहार, धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय शरीरात खराब कोलेस्ट्रॉल साचून राहण्यास सुरुवात होते. शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे हार्ट ब्लॉकेज, स्ट्रोक इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. खराब कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहतो. हा चिकट संपूर्ण शरीराच्या रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
चुकूनही पिऊ नका ‘या’ फळांचे रस! शरीराला फायदे होण्याऐवजी होईल गंभीर नुकसान, आतड्यांना पोहचेल हानी
शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कंटोळ्यांचे सेवन करावे. यामध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. कंटोळ्यांमध्ये फ्लॅव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सीडंट्स शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करते. हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी कंटोली खावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कंटोली भाजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात पडवळ भाजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात पडवळ भाजी खावी. या भाजीमध्ये अजिबात कोलेस्ट्रॉल नसते. याशिवाय कमी कॅलरीज असलेल्या भाजीचे आहारात सेवन करावे. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला प्लेक कमी करण्यासाठी पडवळ भाजीचे सेवन करावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. भेंडीची भाजीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भेंडीची भाजी पचनास अतिशय हलकी असते. भेंडीमध्ये अँटिऑक्सीडंट्स आणि अनेक सूक्ष्म पोषक घटक आढळून येतात. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
चवीला कडू लागणारी कारली अनेकांना खायला आवडत नाही. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कारल्याचा रस प्यावा. या रसाचे सेवन केल्यामुळे संपूर्ण शरीर स्वच्छ होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यासाठी कारल्याचा रस प्यावा. यामुळे शरीरात साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी होईल.
Baba Ramdev ने डायबिटीसवर दिला ‘देशी’ उपाय, आयुर्वेदिक औषधाने शुगर राहील नियंत्रणात
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा शरीरातील एक नैसर्गिक स्निग्ध पदार्थ आहे, जो यकृतामध्ये तयार होतो आणि आपण खातो त्या काही पदार्थांमध्येही असतो.हे पेशींच्या कार्यासाठी आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक असते.
उच्च कोलेस्ट्रॉलची कारणे?
चरबीयुक्त पदार्थ खाणे, पुरेशा व्यायामाचा अभाव, जास्त वजन असणे हे प्रमुख कारण आहेत. काही लोकांमध्ये जनुकांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?
रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निरोगी आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि धूम्रपान व मद्यपान टाळणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घ्या.