Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cholesterol वाढल्याची लक्षणेच दिसत नाहीत, आढळतेय सर्वात मोठी समस्या

अनेकदा रक्तात कोलेस्ट्रॉल वाढतंय त्याची लक्षणेच दिसून येत नाही आणि त्याचा परिणाम हार्टवर होताना दिसून येतो. ही समस्या दिवसेनदिवस वाढताना दिसून येत आहे. तज्ज्ञांनी महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 24, 2025 | 03:33 PM
कोलेस्ट्रॉलची लक्षणे न ओळखता आल्याने काय होतं (फोटो सौजन्य - iStock)

कोलेस्ट्रॉलची लक्षणे न ओळखता आल्याने काय होतं (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

Dyslipidemia म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये रक्तातील लिपिडच्या पातळीमध्ये असाधारण बदल होतात, यात लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन (LDL) ची पातळी वाढणे, हाय-डेन्सिटी लायपोप्रोटीन (HDL)ची पातळी कमी होणे किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढणे यांचा समावेश होतो. या स्थितीमुळे कार्डिओव्हॅस्क्युलर समस्या होऊ शकतात आणि अ‍ॅथेरोस्क्लेरॉसिस, हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका वाढतो. डिसलिपिडेमियाची लक्षणे अतिशय सर्वसामान्य असतात आणि म्हणूनच या स्थितीचे निदान होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. धमन्यांमध्ये कॉलेस्ट्रोलचा थर साचत असले तरी ब्लॉकेज तयार होईपर्यंत शरीर प्रतिक्रिया देत नाही, ज्यामुळे हार्ट अटॅक (हृदयाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होणे) आणि स्ट्रोक (मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होणे) येऊ शकतो. 

ज्यावर वेळीच उपचार न झाल्यास त्यातून अपंगत्व किंवा अगदी मृत्यूही ओढावू शकतो. खरेतर डब्‍ल्‍यूएचओच्या अंदाजानुसार दरवर्षी जगभरात होणाऱ्या २६ लाख मृत्यू आणि अपंगत्वासोबतच्या घालवल्या जाणाऱ्या २.९७ कोटी जणांच्या आयुष्याचे कारण कॉलेस्ट्रोलची वाढलेली पातळी हे आहे. 

लक्षणेच दिसत नाहीत

डिस्लिपिडेमियासारख्या स्थितींमध्ये लक्षणे दिसत नसल्याने निदान व उपचारांना विलंब होतो, ज्यामुळे प्रतिबंधात्मक हस्तक्षेपांसाठी मिळू शकणारी व जीवनशैलीतील बदलांसाठीची निर्णायक वेळ हातची निसटून जाते. बहुतांश रुग्ण खूप उशीर होईपर्यंत वैद्यकीय मदत घेत नाहीत, याचे कारण बहुतेक पुढील यादीमध्ये दिलेली लक्षणे खूपच सर्वसामान्य वाटणारी असतात, जसे कीः 

  • छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे
  • धाप लागणे
  • थकवा 
  • शारीरिक कामे करताना श्वास न पुरणे 
  • उच्च रक्तदाब
  • हृदय धडधडणे 
रोज सकाळी औषध गिळण्यापेक्षा 7 सोप्या उपायांनी करा घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी, Heart Attack चा धोकाही टळेल

काय सांगतात तज्ज्ञ

या स्थितीविषयी बोलताना मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निहार मेहता म्हणाले, “डिसलिपिडेमिया ही स्थिती उपचारांनी सहज बरी होण्यासारखी आहे आणि योग्य औषधे व जीवनशैलीतील बदलांच्या साथीने तिचे व्यवस्थापन करता येते. टोटल कॉलेस्ट्रोल चाचणीमधून एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल), एचडीएल (गुड कोलेस्ट्रॉल) आणि ट्रायग्लिसराइड्स यांची पातळी समजते. 

आजाराचा धोका अधिक असलेल्या लोकसंख्यागटातील, कुटुंबात हायपरकोलेस्ट्रोलेमियाचा पूर्वेतिहास असलेल्या, लठ्ठपणा व मधुमेह असलेल्या, एलडीएलची पातळी वाढविणारा एखादा अनुवांशिक आजार असलेल्या व्यक्तींनी नियमितपणे लिपिड प्रोफाइल तपासून घ्यायला हवे, विशेषत: उच्च धोका असलेल्या किंवा बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तींनी ही चाचणी करणे व डिसलिपिडेमियाचे लवकर निदान होण्याच्या आणि दीर्घकालीन गुंतागूंती टाळण्यासाठी तत्परतेने आजाराचे व्यवस्थापन सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

तज्ज्ञांचे मत 

लिपिडची इष्टतम पातळी ही व्यक्तीचे वय, लिंग आणि धोका वाढविणारे इतर घटक यांच्यानुसार बदलते, मात्र सर्वसाधारणपणे ती पुढील टप्प्यामध्ये असणे योग्य मानले जाते:

  • एलडीएल कोलेस्ट्रॉल:  १०० mg/dL हून कमी
  • एचडीएल कोलेस्ट्रॉल: पुरुषांसाठी ४० mg/dL  हून अधिक व स्त्रियांसाठी ५० mg/dL हून अधिक 
  • ट्रायग्लिसराइड्स: १५० mg/dL हून कमी 
  • एकूण कोलेस्ट्रॉल: २०० mg/dL हून कमी 
आरोग्याला अधिक पूरक सवयी अंगिकारल्याने लिपिड प्रोफाइलमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते व कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका कमी होतो. संतुलित आहार व नियमित व्यायामासह जीवनशैलीतील बदलांमुळे डिसलिपिडेमिया आटोक्यात राहण्यास मदत होते, मात्र तो बरा होत नाही. अधिक चांगल्या परिणामांसाठी औषधांचे वेळापत्रक काटेकोरपणे घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

लिपिड इष्टतम पातळीपेक्षा जास्त असेल तर कॉलेस्ट्रोल, सॅच्युरेटेड फॅट्स, अतिरिक्त साखर आणि मीठ अससेले अन्नपदार्थ टाळावेत. आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करण्याची काळजी घ्या. शरीराचे वजन व बॉडी मास इंडेक्स योग्य पातळीवर राखणे, धूम्रपान सोडणे आणि मद्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे या गोष्टींचा सल्ला दिला जातो. 

शरीरात जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल भस्मसात करतील 5 पदार्थ, कोपऱ्यापासून होईल नष्ट

कोणी घ्यावी काळजी 

डायबेटिस, उच्च रक्तदाब, हायपोथायरॉइडिझम, क्रॉनिक किडनी डिजिज किंवा लिव्हर डिजिजसारख्या सहआजारांचा लिपिडच्या पातळ्यांवर परिणाम होऊ शकतो किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका वाढू शकतो; म्हणूनच, सर्व औषधे वेळच्यावेळी घेणे आणि फॉलो-अपसाठी आपल्या डॉक्टरांची नियमितपणे भेट घेणे महत्त्वाचे आहे. गुंतागुंत टाळण्यासाठी व दीर्घकाळासाठी हृदयाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

संदर्भ 

  1. Dyslipidemia by Nikos Pappan; Ayoola O. Awosika; Anis Rehman
  2. An Update on Dyslipidemia Management and Medications: A Review
  3. A Modern Approach to Dyslipidemia

Web Title: There are no symptoms of high cholesterol the biggest problem called dyslipidemia health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • cholesterol symptoms
  • Health News

संबंधित बातम्या

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान
1

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी
2

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही
3

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
4

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.