कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत
आजच्या युगात उच्च कोलेस्टेरॉलची समस्या झपाट्याने वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक त्याचे बळी ठरत आहेत. कोलेस्टेरॉलच्या समस्येला सायलेंट किलर म्हणतात, कारण ती हळूहळू वाढत राहते आणि अचानक हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा झटका येतो. चिंतेची बाब म्हणजे अनेकांचे कोलेस्टेरॉल धोकादायक पातळीवर पोहोचले आहे, तरीही त्यांना याची जाणीवही होत नाही. जर तुम्हालाही उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असेल तर आजच तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा. या गोष्टी शिरांमध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करू शकतात.
डाएट मंत्रा क्लिनिक, नोएडाच्या संस्थापक आणि वरिष्ठ आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी सांगितले की, अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात आढळणारे ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास मदत करतात. रोज अक्रोड खाल्ल्याने रक्तवाहिन्यांची सूज कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो (फोटो सौजन्य – iStock)
बीन्स आणि कडधान्यांमध्ये जास्त फायबर
आहारात बीन्स आणि कडधान्याचा योग्य समावेश करून घ्या
तज्ज्ञांच्या मते, बीन्स आणि कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे विरघळणारे फायबर रक्तातील कोलेस्टेरॉल शोषून घेतात आणि ते शरीरातून काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी (LDL) वेगाने कमी होऊ शकते. याशिवाय डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कडधान्ये केवळ कोलेस्ट्रॉल कमी करत नाहीत तर वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. यामुळे एकूण आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते.
नसांना ब्लॉक करणारे घाणेरडे कोलेस्ट्रॉल सहज बाहेर काढतील 5 पदार्थ, शरीर सडण्यापासून वाचेल
सफरचंद ठरते उत्तम
नियमित सफरचंद खावे
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी सफरचंद हा रामबाण उपाय मानला जाऊ शकतो. सफरचंदात पेक्टिन नावाचा विद्राव्य फायबर आढळतो, जो शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. सफरचंदात आढळणारे पोषक तत्व रक्तातील कोलेस्टेरॉल शोषून घेतात आणि ते काढून टाकतात, त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होते. रोज एक सफरचंद खाल्ल्याने केवळ कोलेस्ट्रॉल कमी होत नाही तर सफरचंदात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी देखील हृदयाचे आरोग्य राखते. सफरचंदमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि पचनसंस्था सुधारते
आळशीच्या बियांचा करा वापर
आळशीच्या बिया ठरतील गुणकारी
आळशी हे ओमेगा-३ फॅटी ॲसिडस्, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहेत. अल्फा-लिनोलेनिक ॲसिड (ALA) त्यांच्यामध्ये आढळते, जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढविण्यात मदत करते. फ्लेक्स बिया रक्त प्रवाह सुधारतात आणि हृदयाचे आरोग्य राखतात. याशिवाय आळशीच्या् बियांमध्ये आढळणारे फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवते आणि पचनसंस्था निरोगी ठेवते. तुमच्या आहारात अळशीच्या बियांचा समावेश करून तुम्ही हृदयविकाराचा धोकाही कमी करू शकता
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर का येतो हार्ट अटॅक? नसांमधील पिवळा थर काढून टाकण्यासाठी सोपे उपाय
हिरव्या पालेभाज्यांचा समावेश
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खाव्या हिरव्या भाज्या
पालक, ब्रोकोली आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या भाज्यांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते कारण त्यातील फायबर कोलेस्टेरॉल शोषून घेते आणि शरीरातून काढून टाकते. याशिवाय हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियमसारखे खनिजेदेखील असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. या भाज्या जळजळ कमी करतात, रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदयाचे स्नायू मजबूत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.