एप्रिल महिन्यात फिरण्यासाठी हे ५ ठिकाण आहेत चांगले, सुंदर दृश्य बघून मन होईल आनंदी (फोटो सौजन्य - PINTEREST)
जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडत. म्हणून कधीही कामातून थोडा वेळ मिळाला तर लॉग आपल्या कुटुंबासोबत फिरायला जातात आणि मजा मस्ती करतात. आता मार्च महिना संपायला आला आहे. मुलांचे परीक्षा देखील संपले आहेत. मुलाना सुट्या लागल्या आहे आणि आताच संधी आहे फिरायला जाण्याची. पण जायचं कुठे? हा प्रश्न नेहमी समोर येतो. परंतु काळजी करू नका तुमच्या प्रश्नाचा उत्तर माझ्याकडे आहे. अशे काही डेस्टिनेशन आहेत जिथे तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करू शकता आणि तुम्ही सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
भारतातील ‘या’ ५ मंदिरात विशेष नवरात्र पूजा, वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध; एकदा जरूर दर्शन करा
1. तवांग
तवांग भारतातला सगळ्यात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हा सुंदर शहर अरुणाचल प्रदेशमध्ये समुद्र तळापासून २६६९ मीटरच्या उंचीवर आहे. याच्या आजूबाजूला सुंदर डोंगर आहेत. जे बघून तुम्ही खुश होणार. बर्फाने झाकलेली हिमालयाची शिखरे या ठिकाणाला आणखी सुंदर बनवतात. येथे पर्वत, जंगले आणि सुंदर तलाव आहेत. तवांगमध्ये बौद्धांची संख्या मोठी असल्याने इथे मॉनेस्ट्रीज देखील बघायला मिळेल. ताशी डेलेक ट्रेक एक धाडसी अनुभव आहे. एप्रिलच्या महिन्यात फिरण्यासाठी तवांग एक चांगले ठिकाण आहेत.
2. पचमढ़ी
एप्रिलमध्ये सगळे लोक पहाडांवर जातात. मध्यप्रदेशचा एकमात्र हिल स्टेशन पचमढी आहे. सातपुडा टेकड्यांवरील पचमढीच्या शिखरावरून दूरवर हिरवळ दिसते. पंचमढी मध्ये आल्यानंतर तुम्ही प्रकुर्तीची सुंदरता समजू शकता. पचमढीमध्ये भव्य कोरीवकाम असलेल्या गुफा आहेत. पंचमढी मध्ये वॉटरफॉल देखील आहे. इथे तुम्ही ट्रेकिंग आणि हायकिंग देखील करू शकता.
3. धर्मशाला
प्रतयेक व्यक्तीला डोंगरावर फिरायला आवडत. चित्रपटात दाखवण्यात आलेले घाट सर्वानाच आवडतात. जर अश्या ठिकाणी जायचं असेल तर धर्मशाळा हे सर्वात छान ठिकाण आहे. धर्मशाळेला मिनी तिब्बत देखील म्हंटल गेलं आहे. तिब्बती लोक या धर्मशाळेत राहतात. इथे तिब्बती झेंडे तुम्हाला सगळीकडे दिसेल. धर्मशाळेजवळ मैक्लोडगंज आहे. डोंगरांच्या मध्ये वसलेले हे ठिकाण आनंददायी आहे.
4. ऊटी
ऊटी हा नाव ऐकताच मन फिरायला लागतो. चित्रपटात दाखवण्यात आलेला उटी हा प्रत्येकानी बघितला असेल. या सुंदर डोंगराळ शहरात कोणालाही जायला आवडेल.इथे आल्यावर असं वाटतं जणू कोणीतरी कॅनव्हासवर चित्र काढलं आहे. ऊटी येथील टायगर हिल आणि डोड्डाबोट्टा टेकडी येथून दिसणारा दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. तलाव आणि धबधबे देखील ऊटीचे सौंदर्य वाढवतात. जेव्हा तुम्ही चायच्या बागानां दुरून बघाल तेव्हा तुम्हाला अजून सुंदर वाटेल.
5. दार्जिलिंग
हिमालयाच्या रांगांमध्ये वसलेले, दार्जिलिंग हे चहाच्या बागा, टेकड्या आणि दऱ्यांचे एक सुंदर स्वर्ग आहे. पश्चिम बंगाल राज्याचा एक भाग दार्जिलिंग भारताचा सगळ्यात रोमँटिक पहाडी भागांपैकी एक आहे. जो गर्मीच्या महिन्यामध्ये सुखद तापमान आणि सुंदर, पर्यटन गतिविधीने भरून आहे. एप्रिलचा महिना दार्जिलिंग फिरण्यासाठी सर्वात चांगला आहे. यादरम्यान तापमान ११ डिग्री सेल्सियस पासून १९ डिग्री सेल्सियसच्या मधात राहतो. बारिश आणि ओले पडण्याची शक्यता असते. म्हणून काही हलके ऊनी कपडे सोबत न्यावे.
तुम्ही भारतातील लंडन पाहिले आहे का? फक्त 5000 रुपयांत करा हनिमूनची प्लॅनिंग