भारतातील 'या' ५ मंदिरात विशेष नवरात्र पूजा, वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध; एकदा जरूर दर्शन करा (फोटो सौजन्य- Pinterest)
काही दिवसात चैत्र नवरात्र सुरु होणार आहे. चैत्र नवरात्रीचा सण माँ दुर्गेच्या ९ रूपांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अधिक शुभ मानला जातो. वैदिक पंचांग नुसार, या वर्षी चैत्र नवरात्र ३० मार्चला सुरु होणार आणि ६ एप्रिलला संपणार आहे. नवरात्र खूप खास मानली जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्र साजरी केली जाते. भारतात अशे काही मंदिर आहे जिथे हा सण भव्य पद्धतीने साजरा केला जातो आणि प्रसिद्ध आहे. नवरात्र मध्ये डांडिया, गरबा, भव्य मंडप सजवले जातात. जर तुम्हाला यावेळी नवरात्र खास पद्धतीने साजरी करायची असेल, जिथे भव्यपणे नवरात्र आयोजित करण्यात येते. तर हा लेख पूर्ण वाचा. आम्ही या लेखात भारतातील अश्या मंदिराबाबत सांगणार आहोत जिथे भव्य नवरात्री साजरी करण्यात येते. इथे तुम्ही जायचा प्लॅन देखील करू शकता.
तुम्ही भारतातील लंडन पाहिले आहे का? फक्त 5000 रुपयांत करा हनिमूनची प्लॅनिंग
कालीघाट मंदिर, कोलकाता, पश्चिम बंगाल
कोलकाता मधील दुर्गा पूजा भव्य पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. या काळात, येथील दृश्य पूर्णपणे वेगळे असते. यादरम्यान संपूर्ण शहरात भक्ती आणि उत्साहाचा माहोल असतो. या सुंदर राज्यात सर्वत्र माँ दुर्गेचे मंडप उभारले जातात. या दिवशी महिला खास सजतात. इथे नवरात्राला सिंदूर कि होळी खेळली जाते. इथे स्थित असलेला कालीघाट मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे चैत्र नवरात्र दरम्यान विशेष हवन, आरती आणि भंडारांचे आयोजन करण्यात येते. नवरात्रीत एकदा तरी इथे नक्की या.
वैष्णो देवी, जम्मू-कश्मीर
वैष्णोदेवी मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र तीर्थ स्थळांपैकी एक आहे. इथे नेहमी भाविकांची गर्दी असते. मात्र इथे नवरात्र मध्ये एक वेगळाच नजर बघायला मिळतो. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक कठीण डोंगर चढतात आणि “जय माता दी” च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. नवरात्रीच्या दिवसांत मातेच्या मंदिरात विशेष प्रार्थना आणि पूजा केली जाते. आईच्या भक्तांसाठी विशेष मेजवानी आणि जागरणांचे आयोजन केले जाते.
विंध्याचल धाम, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात असलेले विंध्यवासिनी देवीचे मंदिरही नवरात्रीत वेगळे दिसते. असे मानले जाते की येथे माता विंध्यवासिनी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. चैत्र नवरात्रीला येथे जत्रा देखील भरते.
अंबाजी मंदिर, गुजरात
गुजरात येथील अंबाजी मंदिर शक्ती उपासना साठी एक चांगले ठिकाण आहे. चैत्र नवरात्रीला येथे विशेष विधी केले जातात. मंदिरला भव्य पद्धतीने सजवले जाते आणि गरबा पण होतो.
कामाख्या देवी मंदिर, आसाम
आसामचा कामाख्या देवी मंदिर देखील नवरात्रीनिमित्त भाविकांनी भरलेले असते. हे मंदिर त्याच्या तांत्रिक सिद्धींसाठी जगभर प्रसिद्ध आहे. नवरात्रात येथे विशेष प्रार्थना आणि यज्ञ केले जातात. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक या मंदिराला प्रदक्षिणा घालतात.