
Liver ला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ही महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे
लिव्हरला सूज येण्याची कारणे?
फॅटी लिव्हर म्हणजे काय?
लिव्हरच्या कार्यात कशामुळे अडथळे निर्माण होतात?
लिव्हर हा मानवी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. हा अवयव पोटाच्या उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली असतो. लिव्हर शरीर डिटॉक्स करते, खाल्लेले अन्नपदार्थ पचन करते, प्रथिने तयार करणे, पित्त तयार करणे, रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवणे इत्यादी ५० पेक्षा जास्त कामे शरीरासाठी करते. पण काही वर्षांमध्ये लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. लिव्हरसबंधित हेपेटायटीस आजार झाल्यानंतर लवकर लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे याला सायलेंट लिव्हर किलर असे सुद्धा म्हंटले जाते. चुकीचा आहार, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव आणि सतत दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हरचे आरोग्य बिघडून जाते. वारंवार दारू प्यायल्यामुळे आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे लिव्हर खराब होणे, फॅटी लिव्हर किंवा कावीळ होण्याची जास्त शक्यता असते. (फोटो सौजन्य – istock)
थंडीत Heart Attack चा धोका का वाढतो? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून अशी घ्या शरीराची काळजी
डॉक्टरांच्या मते, लिव्हरसबंधित आजाराची लक्षणे शरीरात वर्षानुवर्षे दिसून येत नाहीत. त्यामुळे लिव्हरच्या आजाराचे निदान करणे डॉक्टरांसाठी अवघड जाते. लिव्हर खराब झाल्यानंतर पुन्हा लिव्हरचे कार्य सुरळीत होण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. आज आम्ही तुम्हाला लिव्हरला सूज आल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसू लागल्यास योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.
हेपेटायटिस म्हणजे लिव्हरला सूज येणे. लिव्हरला सूज येणे ही स्थिती शरीरासाठी जीवघेणी आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. हेपेटायटिसमुळे लिव्हरच्या वॉलला सूज येते आणि लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. हेपेटायटिस A, B, C मध्ये लिव्हरची सूज वाढते आणि काम करण्याची क्षमता कमी होऊन जाते.
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर सगळ्यात आधी दिसून येणारे लक्षण म्हणजे थकवा, अशक्तपणा जाणवणे. शांत झोप झाल्यानंतर सुद्धा शरीरात कायमच थकवा जाणवू लागतो. याशिवाय कोणतेही व्यायाम किंवा आहार फॉलो न करता झपाट्याने वजन कमी होऊन जाते. वजन कमी होत असल्यास दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून काळजी घ्यावी.
लिव्हरला सूज आल्यानंतर खाण्यापिण्याची इच्छा पूर्णपणे कमी होऊन जाते. कोणताही पदार्थ पाहिल्यानंतर तो खाण्याची इच्छा अजिबात होत नाही. याशिवाय तुमच्या त्वचेचा रंग पूर्णपणे पिवळा होऊन जातो. लिव्हरवर आलेल्या अतिरिक्त तणावामुळे रक्तात Bilirubin वाढते आणि त्वचेचा रंग पिवळा होऊन जातो. तसेच लघवीच्या रंगात सुद्धा अनेक बदल दिसू लागतात.
Ans: सतत थकल्यासारखे वाटणे, पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला वेदना किंवा सूज येणे.
Ans: यकृताचा संसर्ग म्हणजे यकृताच्या ऊतींमध्ये विषाणू, जीवाणू किंवा परजीवींसारख्या रोगजनकांचा प्रवेश होणे.
Ans: हिपॅटायटीस बी (HBV) किंवा हिपॅटायटीस सी (HCV) सारखे तीव्र विषाणूजन्य संक्रमण.