रात्रीच्या जेवणानंतर करा 'ही' सोपी गोष्ट! कधीच उद्भवणार नाही बद्धकोष्ठता-अपचनाची समस्या
वज्रासन करण्याचे फायदे?
रात्रीच्या जेवणानंतर ऍसिडिटी का वाढते?
शांत आणि गाढ झोपेसाठी काय करावे?
धावपळीच्या जीवनशैलीमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कामाचा तणाव, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया, वारंवार जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर होतात. रात्रीच्या जेवणात अतितिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन न झाल्यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता वाढून उलट्या आणि मळमळ होते. ऍसिडिटी वाढल्यानंतर डोकेदुखीचा सुद्धा त्रास होतो. रात्रीच्या वेळी शरीराची पचनक्रिया मंदावते, त्यामुळे तिखट आणि तेलकट पदार्थ लवकर पचन होत नाहीत. वारंवार उद्भवणाऱ्या पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रात्री जेवणानंतर ५ मिनिटं वज्रासनात बसल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
रात्रीच्या जेवणानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. पोटात अन्नपदार्थ बराच वेळ तसेच राहिल्यामुळे पोटात जडपणा जाणवणे, उलट्या, ऍसिडिटी इत्यादी समस्या वाढतात. त्यामुळे जेवल्यानंतर ५ ते १० मिनिटं नियमित वज्रासनात बसावे. असे केल्यामुळे शरीराच्या मध्यभागातील रक्तभिसरण वाढते. तसेच रक्ताचा प्रवाह पचनसंस्थेकडे वळवल्यामुळे अन्नपदार्थ पचन होतात. तसेच वज्रासनात बसल्यामुळे जेवल्यानंतर येणारी सुस्ती कमी होते आणि शरीर आतून सक्रिय राहते.
बऱ्याचदा जेवल्यानंतर छातीत जळजळ किंवा वारंवार आंबट ढेकर येतात. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी वज्रासनात बसावे. यामुळे पोटातील आम्ल वरच्या दिशेने अन्ननलिकेत येण्यापासून रोखले जाते आणि पोटाची स्थिती कायमच निरोगी राहते. वज्रासनात बसल्यामुळे जुनाट पित्ताच्या त्रासापासून कायमची सुटका मिळते आणि शरीरातील अवयवांची स्थिती सुधारते.
शरीरात वाढलेल्या मानसिक तणावाचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मन शांत राहिल्यास शारीरिक स्थितीसुद्धा कायमच हेल्दी राहते. जेवणानंतर तसेच सकाळी उठल्यानंतर नियमित वज्रासन केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल आणि पोट हलके राहील. निद्रानाशाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी वज्रासन करावे.
Ans: पोटात तयार होणारे ऍसिड अन्ननलिकेत परत येणे, ज्यामुळे जळजळ होते.
Ans: छातीत आणि घशात जळजळ, पोटात मळमळ, पोटदुखी, गोळा येणे.
Ans: पोट साफ न झाल्यासारखे वाटते, शौचास त्रास होतो आणि अस्वस्थता येते.






