थंडीत Heart Attack चा धोका का वाढतो? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून अशी घ्या शरीराची काळजी
थंडीत हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?
उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे?
हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी शरीराची काळजी कशी घ्यावी?
हल्ली कोणत्याही वयात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता आणि अपुऱ्या झोपेमुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक बदल दिसून येतात. मात्र या बदलांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घ्यावी. राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीत शरीरसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. (फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक येण्यास चुकीची जीवनशैली कारणीभूत ठरते. कारण दैनंदिन आहारात सतत तिखट आणि अतितेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तात कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला पिवळ्या रंगाचा चिकट थर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो, ज्यामुळे हार्ट अटॅक, स्टोक किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याची काय कारणे आहेत? हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
वाढत्या थंडीत हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. शरीराच्या रक्तभिसरणावर परिणाम झाल्यानंतर हृदयाला पुरेसे रक्त, ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे हृदयावर जास्तीचा तणाव येतो. यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्तभिसरणावर परिणाम दिसून येतात. तसेच ज्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये आधीच हार्ट ब्लॉकेज असते, त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे हृदयाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी.
थंडीच्या दिवसांमध्ये नियमित रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत. याशिवाय कडाक्याच्या थंडीत बाहेर फिरायला जाण्याआधी ऊबदार कपडे परिधान करावेत. यामुळे थंडी कमी वाजते. तसेच सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याची अंघोळ अजिबात करू नये. थंड पाण्याने अंघोळ केल्यास रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते. तसेच रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी सकाळी उठून अवघड व्यायाम करू नये. तसेच शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी.
Ans: जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये (कोरोनरी धमन्या) अडथळा निर्माण होतो, तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
Ans: छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना, चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवणे.
Ans: स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळी लक्षणे जाणवण्याची शक्यता असते.






