Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निरोगी गर्भधारणा आणि बाळाच्या पोषणासाठी आवश्यक ठरतात ‘ही’ जीवनसत्वे, जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला महत्वपूर्ण सल्ला

आईच्या गर्भातील बाळाच्या वाढीसाठी गरोदरपणात महिला आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला निरोगी गर्भधारणा आणि बाळाच्या पोषणासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2025 | 10:55 AM
निरोगी गर्भधारणा आणि बाळाच्या पोषणासाठी आवश्यक ठरतात 'ही' जीवनसत्वे

निरोगी गर्भधारणा आणि बाळाच्या पोषणासाठी आवश्यक ठरतात 'ही' जीवनसत्वे

Follow Us
Follow Us:

प्रत्येक महिलेसाठी आई होणे ही जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे. गरोदरपणात सर्च महिला बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात बदल करणे, शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादी सर्वच गोष्टींवर व्यवस्थित लक्ष दिले जाते. आईच्या गर्भात बाळाचे सर्व अवयव तयार होतात. त्यामुळे बाळाच्या पोषणासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध आणि आहारात बदल करून शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? ‘या’ पदार्थांचे सेवन करून कायम राहा फ्रेश आणि हेल्दी

गर्भधारणा व निरोगी गरोदरपणामध्ये पोषण महत्वपूर्ण भूमिका बजावते. समतोल आणि पोषणसमृद्ध आहारामुळे गर्भधारणेची संभाव्यता वाढते आणि गर्भाच्या विकासासाठी तसेच मातेच्या स्वास्थ्यासाठी हा आहार उपयुक्त ठरतो. बाळ आणि आई दोघांमधील दीर्घकालीन निष्पत्तीवर आहाराचा प्रभाव असतो. ही माहिती डॉ. प्रियांका शहाणे, फर्टिलिटी स्पेशॅलिस्ट, बिर्ला फर्टिलिटी अ‍ॅण्ड आयव्हीएफ, नागपूर यांनी दिली आहे.

आरोग्यकारक आहाराचे महत्त्वपूर्ण लाभ पुढीलप्रमाणे:

गर्भाच्या विकासात मदत – अत्यावश्यक पोषकांचे पुरेसे सेवन केल्यास गर्भाच्या वाढीत तसेच इंद्रिय विकासात मदत होते.
गरोदरपणातील गुंतागूंती कमी होतात – गर्भारावस्थेतील मधुमेह, प्रीएक्लम्शिया (गरोदरपणात रक्तदाब वाढण्याची अवस्था), अशक्तपणा, वजन अति वाढणे आदींचा धोका पोषक आहारामुळे कमी होतो. या आजारांचा माता व बाळ दोघांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
मातेच्या आरोग्यात सुधारणा चांगल्या पोषणामुळे मातेची रोगप्रतिकार यंत्रणा सशक्त होते, त्यामुळे प्रादुर्भावांचा धोका कमी होतो आणि प्रसुतीनंतर प्रकृती पूर्वपदावर येण्यात मदत होते.

बाळात दोष निर्माण होण्याचा धोका कमी होतो – बाळाच्या न्युरल ट्युबच्या (गर्भाचा मेंदू व मज्जारज्जू ज्यापासून तयार होतो ती पोकळ नळी) विकासासाठी फॉलिक ऍसिडचा आवश्यक त्या प्रमाणात ग्रहण केले गेले पाहिजे. गर्भधारणेसाठी तसेच निरोगी पद्धतीने गर्भ टिकवून धरण्यासाठी स्त्रियांच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, हलकी प्रथिने (लीन प्रोटिन), आरोग्यकारक मेद आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. पुढील पोषके आहारातून घेण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे.

कडक उन्हाळ्यात बाहेर गेल्यानंतर उद्भवू शकते उष्णमाघाताची समस्या! जाणून घ्या उष्माघाताची लक्षणे आणि उपाय

बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले विटामिन्स:

  • फॉलिक ऍसिड – न्युरल ट्यूबमध्ये दोष निर्माण होऊ नयेत यासाठी अत्यावश्यक
  • लोह – आहारात लोह घेतल्यास लोहाची कमतरता टाळली जाते, भारतात ५० टक्क्यांहून अधिक स्त्रिया व पाच वर्षांखालील दोन-तृतीयांश मुले यांच्यात लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा (ऍनिमिया) आढळतो.
  • कॅल्शिअम – बाळाच्या हाडांच्या व दातांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण
  • आयोडिन – थायरॉइडच्या कार्यासाठी तसेच मेंदूच्या विकासासाठी आवश्यक
  • ड जीवनसत्त्व – हाडांचे आरोग्य व रोगप्रतिकाराच्या कामासाठी महत्त्वाचे
  • ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स – मेंदूच्या व डोळ्याच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे. अपत्यासाठी नियोजन करणाऱ्या किंवा गरोदर
  • असलेल्या स्त्रियांनी मद्यपान, कच्चे किंवा न शिजवलेले अन्न, अतिप्रक्रियाकृत अन्न आणि कॅफिन टाळावे किंवा कमी करावे, कारण या सर्वांचा गर्भाच्या तसेच मातेच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Web Title: These vitamins are essential for a healthy pregnancy and babys nutrition health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • pregnancy health
  • pregnancy tips
  • women health

संबंधित बातम्या

न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती
1

न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
2

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.