फोटो सौजन्य - Social Media
तहान लागणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. तहान लागलीच पाहिजे, यावरच तर आपले जीवन आहे. परंतु, जेव्हा पाणी पिऊनसुद्धा तहान भागत नाही. त्यावेळी, नक्की करावे तरी काय? असा प्रश्न निर्माण होतो. बहुतेक जणांना या त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास एक फार गंभीर समस्याही असू शकते. लागलेली तहान अनेकदा पाणी पिऊनही मिटत नसले तर त्यामागे अनेक शारीरिक आणि आरोग्यविषयक कारणे कारणीभूत ठरू शकतात.
पॉलीडिप्सिया
तहान लागणे शरीराच्या शारीरिक प्रक्रियेचा एक अत्यंत सामान्य भाग आहे. जेव्हा शरीराला पाणी कमी पडते, तेव्हा हे प्रोत्साहन मिळते की, ते अधिक पाणी पिऊन घ्या. परंतु, काही परिस्थितींमध्ये शरीराला इतकी तहान लागते की ती केवळ पाणी पिण्याने भागत नाही. या परिस्थितीला “पॉलीडिप्सिया” असे म्हणतात. पॉलीडिप्सिया एक स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीस अत्यधिक तहान लागते. कितीही पाणी प्यालं तरी तहान मिटत नाही. ही स्थिती एका दिवसापासून ते काही महिन्यांसाठी शरीरात राहू शकते. पॉलीडिप्सिया ही एक गंभीर स्थिती असू शकते, जी कधीकधी अंतर्गत शारीरिक विकारांमुळे होऊ शकते. या विकाराच्या कारणांमध्ये डायबिटीज इन्सिपिडस, हॉर्मोनल असंतुलन, किंवा मनोविकारांचा समावेश असू शकतो.
डायबिटीज इन्सिपिडस
डायबिटीज इन्सिपिडस (Diabetes Insipidus) समस्येमध्ये देखील वारंवार तहान लागते. पाणी पिऊनही तहान जाणवू लागते. या आजारामध्ये किडनी आणि त्यास संबंधित ग्रंथी तसेच हार्मोन्सही प्रभावित होतात. यामुळे जास्त यूरीन तयार होऊ शकतो, ज्यामुळे वारंवार तहान लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
हायपोक्लेमिया
जेव्हा शरीरामध्ये पोटॅशिअमची पातळी घसरते. घसरत घसरत पोटॅशिअमची पातळी अतिशय कमी होत जाते. तेव्हा शरीरामध्ये हायपोक्लेमियासारखी स्थिती उद्भवते. या परिस्थितीत रुग्णाला उलटी सारखा त्रास होऊ शकतो. पाण्याची फार तहान लागते. ही तहान फार वेळेपर्यंत राहू शकते.
शरीराच्या या लक्षणांना दुर्लक्ष कारणे पडेल महागात
जरी पाण्याची तहान लागणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. तरी त्याला काही मर्यादा असणे आवश्यक आहे. तहान लागली असेल तर पाणी प्या आणि ते करूनही तहान जात नाही आहे तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे काही गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात. दिवसातून कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी पिणे शरीरासाठी उत्तम मानले जाते. परंतु, यापेक्षा कमी किंवा जास्त पाण्याचे सेवन कारणे शरीरासाठी आणि शरीराच्या आरोग्यसाठी धोकादायक असते.