Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन नाही ही आहे फणसाची बिर्याणी; 31 डिसेंबरची पार्टी होईल रंगतदार… व्हेज बिर्याणी देईल नॉनव्हेजचा स्वाद

Jackfruit Biryani Recipe : नॉनव्हेजचा प्लॅन झाला फ्लॉप, 31 डिसेंबरला आलीये एकादशी! पण टेन्शन कशाला व्हेजमध्येही मिळेल नॉनव्हेजचा स्वाद जेव्हा तुम्ही घरी बनवाल फणसाची बिर्याणी. दिसायलाच नाही तर चवीलाही ही बिर्याणी टॉप क्ल

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 21, 2025 | 03:22 PM
चिकन नाही ही आहे फणसाची बिर्याणी; 31 डिसेंबरची पार्टी होईल रंगतदार... व्हेज बिर्याणी देईल नॉनव्हेजचा स्वाद

चिकन नाही ही आहे फणसाची बिर्याणी; 31 डिसेंबरची पार्टी होईल रंगतदार... व्हेज बिर्याणी देईल नॉनव्हेजचा स्वाद

Follow Us
Close
Follow Us:
  • 31 डिसेंबरला एकादशी आल्याने अनेकांचा नॉनव्हेज खाण्याचा प्लॅन फेल झाला आहे.
  • पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही फणसापासूनही एक लज्जतदार बिर्याणी तयार करू शकता.
  • व्हेज असली तरी ही बिर्याणी रिच आणि शाही चव देते, एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा मागून खाल अशी ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा.
बिर्याणी म्हटलं की बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर चिकन किंवा मटण बिर्याणीच येते, पण शाकाहारी बिर्याणीही तितकीच स्वादिष्ट आणि खास असू शकते, हे फणसाची बिर्याणी सिद्ध करून दाखवते. कच्चा फणस हा चवीला आणि टेक्सचरला मटणसारखा वाटतो, त्यामुळे ज्यांना मांसाहार टाळायचा आहे पण बिर्याणीचा रिच स्वाद हवा आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. पारंपरिक मसाल्यांचा सुगंध, बासमती तांदळाची लांब लांब दाणेदार भाताची रचना आणि फणसाचे मऊ पण घट्ट तुकडे यामुळे ही बिर्याणी खास बनते.

सणावाराला, पाहुण्यांसाठी किंवा एखाद्या वीकेंडला काहीतरी वेगळं आणि स्पेशल करायचं असेल, तर फणसाची बिर्याणी नक्की ट्राय करावी. फणसामध्ये फायबर भरपूर असते, त्यामुळे ही डिश पोटासाठीही हलकी आणि पौष्टिक ठरते. योग्य मसाल्यांचं प्रमाण आणि दमावर शिजवण्याची पद्धत वापरली, तर ही बिर्याणी अगदी हॉटेल स्टाईल बनते. चला तर मग पाहूया, घरीच स्टेप-बाय-स्टेप फणसाची बिर्याणी कशी बनवायची.

 साहित्य

फणस शिजवण्यासाठी:

  • कच्चा फणस – 2 कप (सोललेला, मोठे तुकडे करून)
  • पाणी – उकळण्यासाठी
  • मीठ – थोडेसे
भातासाठी:
  • बासमती तांदूळ – 2 कप
  • पाणी – 8 कप
  • तेजपत्ता – 2
  • लवंग – 4–5
  • हिरवी वेलची – 3–4
  • दालचिनी – 1 इंच तुकडा
  • मीठ – चवीनुसार
बिर्याणी मसाल्यासाठी:
  • तेल – 3 टेबलस्पून
  • तूप – 2 टेबलस्पून
  • कांदा – 3 मध्यम (पातळ कापलेले)
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • हिरवी मिरची – 2 (चिरलेली)
  • टोमॅटो – 2 (चिरलेले)
  • दही – 1/2 कप
  • हळद – 1/2 टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे पूड – 2 टीस्पून
  • गरम मसाला – 1 टीस्पून
  • बिर्याणी मसाला – 1 टेबलस्पून
  • कोथिंबीर – 1/2 कप (चिरलेली)
  • पुदिन्याची पाने – 1/4 कप
  • केशर – थोडेसे (कोमट दुधात भिजवलेले)
हिवाळ्यात पळून जातील पित्तासह इतर आजार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आमसुलाचे सार, आजीबाईच्या बटव्यातील रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम कच्चा फणस मीठ घालून पाण्यात अर्धवट शिजवून घ्या. पाणी काढून बाजूला ठेवा.
  • मोठ्या भांड्यात पाणी उकळवा, त्यात सगळे खडे मसाले आणि मीठ घालून भात 70% शिजवून गाळून ठेवा.
  • कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तळा. अर्धा कांदा बाजूला काढून ठेवा.
  • त्याच तेलात आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परता.
  • टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा, मग दही घालून सतत ढवळत राहा.
  • हळद, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
  • आता शिजवलेला फणस घालून 5–7 मिनिटे मसाल्यात मुरू द्या.
  • जाड बुडाच्या भांड्यात खाली फणसाचा मसाला, त्यावर भाताचा थर घाला. वरून तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना व केशर दूध घाला.
  • झाकण लावून मंद आचेवर 15–20 मिनिटे दम द्या.
  • दम सुटल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • फणसाची बिर्याणी रायता, सॅलड किंवा लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह केली तर तिची चव अजूनच खुलते.
  • शाकाहारी असली तरी या बिर्याणीला रिच आणि शाही चव आहे जी कुणालाही खाता क्षणीच पसंत पडेल.

Web Title: Thirty first party special rich and royal jackfruit biryani recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • biryani
  • dum biryani
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’
1

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

Recipe : गावराण पद्धतीत घरी बनवा झणझणीत आणि मसालेदार ‘भरलेलं वांग’, सुगंधानेच तोंडात येईल पाणी
2

Recipe : गावराण पद्धतीत घरी बनवा झणझणीत आणि मसालेदार ‘भरलेलं वांग’, सुगंधानेच तोंडात येईल पाणी

Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणचं, काही मिनिटांची रेसिपी
3

Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणचं, काही मिनिटांची रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल
4

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.