
हरियाणात बिर्याणीच्या स्टॉलवर जोरदार हाणामारी
नूंह-तावडू रस्त्यावर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. या हिंसाचारात बंदूक, लाठ्या काठ्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि काचांच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नूंह-तावडू परिसरात बिर्याणीचा स्टॉल लावण्यावरून वाद जलयाचे समोर आले आहे. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
बिर्याणीचा स्टॉल लावणे आणि त्याचे भाडे देण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. दोन गट आमनेसामने आले. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. थोड्याच वेळात हा वाद इतका वाढला की दोन्ही बाजूला लोकांची मोठी गर्दी जमली. या वादाचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत झाले. या भीषण मारहाणीत आणि दगडफेकीत दोन्ही बाजूंचे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
हरियाणा के नूंह में बिरयानी की रेहड़ी लगाने के किराये को लेकर दो पक्षों में खूनी संघर्ष! नूंह-तावड़ू रोड स्थित सौंख अड्डे पर जमकर लाठी-डंडे चले, पथराव और कांच की बोतलों से हमला हुआ। हवाई फायरिंग भी की गई। सड़क पर घंटों जाम लगा और कई वाहनों के शीशे टूट गए। घटना में कई लोग घायल। https://t.co/5JpjOVH0xa — Goraksha Pophlee (@PophleeGor51025) November 10, 2026
हरियाणातील नूंह-तावडू परिसरात बिर्याणीच्या स्टॉलवरून हिंसक चकमकीबाबत प्रत्यक्षदर्शींनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. दोन गटांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर रस्त्यावर तुफान राडा झाला, ज्यामुळे अनेक तास परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वादाची ठिणगी पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढवला. यानंतर हिंसाचार वाढला आणि दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक केली गेली. या हाणामारीदरम्यान अचानक झालेल्या हवेत गोळीबार देखील केला गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन गटांमधील तुफान हाणामारी आणि दगडफेकीदरम्यान रस्त्यावरून जाणारी अनेक वाहने उपद्रवींच्या तावडीत सापडली. संतप्त टोळक्याने रस्त्यावरील अनेक गाड्यांना लक्ष्य करत त्यांची तोडफोड केली, ज्यामुळे अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. या संपूर्ण हिंसाचाराचे आणि तोडफोडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले आहे.
Ans: हाणामारी होत असलेला व्हायरल व्हिडिओ हरियाणा राज्यातील नूह जिल्ह्याचा आहे.
Ans: बिर्याणचा स्टॉल लावण्यावरून दोन गट आमनेसामने आल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.