१० मिनिटांमध्ये झटपट बनवा आमसुलाचे सार
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणात प्रत्येकाला काहींना काही गरमागरम खाण्यास आणि पिण्यास हवे असतात. गरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाहेरून विकतचे चिकन सूप किंवा मिक्स भाज्यांचे सूप आणले जाते. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आजीबाईच्या बटव्यातील गरमागरम आमसूल सार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही कोकम किंवा चिंचेचा वापर करू शकता. आंबट चवीचे पदार्थ शरीरात विटामिन सी वाढवतात. बऱ्याचदा घरात टोमॅटो सार किंवा कैरीचा सार बनवला जातो. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थांपासून बनवलेले सार खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही चिंच किंवा आमसूल सार बनवून खाऊ शकता. आमसूल सार तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता. यामुळे घशात उष्णता जाणवते. चला तर जाणून घेऊया आमसूल सार बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






