पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी हे ड्रिंक ठरेल प्रभावी
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप आणि मानसिक तणावामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. वाढत्या वयात शरीरात अनेक बदल होत असतात. पण या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीरातील अतिशय लहान समस्या आणखीनच मोठ्या होतात. शरीरात लठ्ठपणा वाढल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवणे अतिशय महत्वाचे आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी आहार तज्ज्ञांकडून महागडे डाएट घेतले जातात. मात्र या डाएटचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. तसेच अनेक लोक तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. मात्र चुकीच्या वेळी व्यायाम केल्यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी तोटे होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
‘या’ फळांच्या सेवनामुळे कधीच वाढणार नाही रक्तातील साखर, वयाच्या ७० व्या वर्षी राहाल निरोगी आणि सुधृढ
वजन वाढल्यानंतर पोटाच्या आजूबाजूने चरबी लटकू लागते. ज्यामुळे स्टयलिश कपडे घालताना महिला काहीशा गोंधळून जातात. तसेच बऱ्याचदा वाढलेल्या वजनांमुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून घरगुती पेय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पेयाचे नियमित सेवन केल्यास शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.
शरीरावर वाढलेले अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठी घरगुती पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. याशिवाय पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो. मसाल्याच्या डब्यातील बडीशेप, ओवा आणि पाणी वापरून फॅट कटर ड्रिंक लगेच तयार होते. यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात ओवा आणि बडीशेप टाकून १० मिनिटं उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून उपाशी पोटी सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल. हे ड्रिंक महिनाभर नियमित प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.
बडीशेपमध्ये असलेले फायबर शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरते. फायबरयुक्त पदार्थ वजन कमी करण्यासाठी अतिशय गुणकारी ठरतात. याशिवाय बडीशेप खाल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. ओव्यामध्ये असलेले थायमोल मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे ओवा आणि बडीशेप एकत्र करून पाणी तयार करून प्यावे.
‘या’ औषधांसोबत कधीच खाऊ नका Ibuprofen, अन्यथा किडनी अक्षरशः सोडून जाईल
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
मांस, मासे, अंडी, डाळी, आणि शेंगा यांसारख्या पदार्थांमध्ये प्रथिने भरपूर असतात.फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्ये फायबरचे चांगले स्रोत आहेत.
वजन कमी करण्यासाठी झोप किती घ्यावी?
पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.प्रत्येक रात्री 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे?
चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, आणि नृत्य यासारख्या ऍरोबिक ऍक्टिव्हिटीज करा.पुश-अप्स, स्क्वॅट्स, आणि लंग्स यांसारख्या शक्ति-प्रशिक्षण व्यायामाचा देखील समावेश करा.