Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाच्या विकेंडला साऊथ इंडियन नाश्त्याचा बेत; घरी बनवा सॉफ्ट आणि मसालेदार Ghee Podi Idli; चवीनेच मन होईल खुश

उरलेली इडली खायचा कंटाळा आला असेल तर यापासून चविष्ट, मसालेदार आणि कुरकुरीत अशी पोडी इडली बनवून पहा. ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2025 | 08:15 PM
यंदाच्या विकेंडला साऊथ इंडियन नाश्त्याचा बेत; घरी बनवा सॉफ्ट आणि मसालेदार Ghee Podi Idli; चवीनेच मन होईल खुश

यंदाच्या विकेंडला साऊथ इंडियन नाश्त्याचा बेत; घरी बनवा सॉफ्ट आणि मसालेदार Ghee Podi Idli; चवीनेच मन होईल खुश

Follow Us
Close
Follow Us:

नाश्त्याचा विचार आला की प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर साऊथ इंडियन पदार्थ म्हणजेच इडली, डोसा हे पदार्थ येतात. हे असे पदार्थ आहेत जे सर्वांनाच नाश्त्यात खायला फार आवडतात. प्रत्येकाच्या घरी विकेंडला इडली-डोसाचा प्लॅन हा बनतोच. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी या पदार्थाचीच एक नवीन आणि ट्रेंडिंग डिश घेऊन आलो आहोत, ज्याचे नाव आहे पोडी इडली!

पावसाळ्यात गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवा आंबट-गोड चवीचे वरण, थंडीत घ्या चविष्ट जेवणाचा आस्वाद

घी पोडी इडली ही एक लोकप्रिय दक्षिण भारतीय डिश आहे, जी विशेषतः तमिळनाडूमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ‘पोडी’ म्हणजे एक विशिष्ट प्रकारची कोरडी चटणी ज्यात तूर डाळ, उडद डाळ, लाल मिरच्या आणि इतर मसाले असतात. ही चटणी इडलीवर टाकून तुपात किंवा तेलात परतवली जाते. चवीला हा पदार्थ फार अप्रतिम, झणझणीत आणि मसालेदार लागतो. तीच तीच इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ही टेस्टी पोडी इडली एकदा नक्की ट्राय करा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • इडल्या – ८ ते १० (शिजवून थंड केलेल्या, कापून छोटे तुकडे केलेले)
  • तूर डाळ – २ टेबलस्पून
  • उडद डाळ – २ टेबलस्पून
  • सुकी लाल मिरची – ४ ते ५
  • हिंग – १ चिमूट
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १ चमचा
  • तीळ – १ चमचा (ऐच्छिक)
  • तूप किंवा तेल – २ टेबलस्पून
  • कढीपत्ता – काही पाने
  • मोहरी – १/२ चमचा
  • हळद – १/४ चमचा
Palak Paneer Recipe: चवीला मजेदार आणि पौष्टिक असा हॉटेलचा लोकप्रिय पदार्थ आता घरीच बनवा

कृती

  • पोडी इडली तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण याचा पोडी मसाला तयार करणार आहोत, हा मसाला तुम्हाला विकतही मिळू शकतो
  • आता एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून तूर डाळ, उडद डाळ, लाल मिरच्या, हिंग आणि तीळ घालून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये चवीनुसार मीठ घालून दरदरीत पूड तयार करा.
  • एक पॅनमध्ये तूप/तेल गरम करा. त्यात मोहरी टाका. फडफडली की कढीपत्ता आणि हळद घाला.
  • त्यात आधीपासून तयार इडलीचे तुकडे घाला आणि हलक्या हाताने परता.
  • आता त्यावर तयार केलेली (किंवा बाजारातून आणलेली) पोडी चटणी आवडीनुसार घालून सर्वकाही नीट एकत्रित मिसळून घ्या.
  • वरून झाकण ठेवून २-३ मिनिटं मध्यम आचेवर तुपाचा वास येईपर्यंत याला छान परतून घ्या.
  • तुमची तयार पोडी इडली गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही इडली तुम्ही नारळाची चटणी किंवा अशीच देखील खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
  • पोडी इडलीसाठी जुना इडलीचा उपयोग केल्यास ती जास्त चांगली लागते कारण ती थोडी कोरडी होते.
  • पोडी मसाल्याचे प्रमाण आपल्या झणझणीत आवडीनुसार ठरवा.

Web Title: This weekend make south indian breakfast at home note down the tasty ghee podi idli recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Healthy Breakfast
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : स्ट्रीट स्टाईल आंबट-गोड अन् चटकदार ‘चिंचेची चटणी’ बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार झटपट
1

Recipe : स्ट्रीट स्टाईल आंबट-गोड अन् चटकदार ‘चिंचेची चटणी’ बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार झटपट

हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा ‘मलाई ब्रोकली’, रेसिपी आहे फार सोपी
2

हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा ‘मलाई ब्रोकली’, रेसिपी आहे फार सोपी

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! घरी बनवा टेस्टी ‘पनीर स्लाइडर’, होम पार्टीसाठी परफेक्ट पर्याय
3

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! घरी बनवा टेस्टी ‘पनीर स्लाइडर’, होम पार्टीसाठी परफेक्ट पर्याय

Recipe : अक्षयतृतीयानिमित्त घरी बनवा रसाळ, चविष्ट आणि गोड चवीची ‘गुलाब रसमलाई’
4

Recipe : अक्षयतृतीयानिमित्त घरी बनवा रसाळ, चविष्ट आणि गोड चवीची ‘गुलाब रसमलाई’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.