जगभरात सुपरमूनला खूप महत्त्व आहे. काहीजण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून सुपरमून पाहतात, तर काहीजण त्यांना पाहण्यात एक सुंदर आनंद मानतात. आधी जून आणि नंतर जुलैमध्ये सुपरमून पाहिल्यानंतर अंतराळ विश्वात रस असणाऱ्यांसाठी या वर्षातील शेवटचा सुपरमून आज ११ ऑगस्ट रोजी दिसणार आहे. ज्याप्रमाणे आधीच्या दोन सुपरमूनला स्ट्रॉबेरी मून आणि थंडर मून असे नाव देण्यात आले होते, त्याचप्रमाणे यावेळी याला ‘फुल स्टर्जन मून’ असे नाव देण्यात आले आहे.
सलग चार सुपरमूनपैकी हा चौथा सुपरमून असेल. नासाच्या म्हणण्यानुसार, स्टर्जन हा शब्द अमेरिकन जमाती अल्गोनक्विनपासून आला आहे. दरवर्षी ही जमात या मोसमात स्टर्जन मासे पकडते, त्यामुळे या पौर्णिमेला स्टर्जन मून म्हटले जाते. जेव्हा चंद्र पूर्ण भरलेला असतो त्याच वेळी चंद्राची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ असते अशा परिस्थितीला सुपरमून म्हणतात. सुपरमून सरासरी रात्रीपेक्षा १४ ते ३० टक्के जास्त उजळ दिसतो. हा सुपरमून बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस दिसण्याची शक्यता आहे.
सुपरमूनती विषयी थोडक्यात माहिती जाणून घ्या
सुपरमून हे साधारणपणे वर्षात ३ ते ४ सुपरमून असतात. २०२२ मध्ये चार सुपरमून दिसणार असून, त्यातील २०२२ चा शेवटचा सुपरमून आज म्हणजेच गुरुवार, ११ ऑगस्ट २०२२ रोजी दिसणार आहे. पौर्णिमेची घटना साधारणतः महिन्यातून एकदा घडते. जेव्हा चंद्र अंतराळात सूर्याच्या विरुद्ध असतो आणि पृथ्वी त्या दोघांच्या मध्ये असते. सुपरमून सामान्यतः नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा अधिक उजळ आणि जवळ दिसतो. न्यूयॉर्कमधील नागरिकांना सुपरमून रात्री ८.१८ च्या सुमारास, लॉस एंजेलिसमधील स्टारगेझर्ससाठी ८.०४ वाजता पाहू शकणार आहेत.