
Raigad News: ‘गुणवत्तेचा नेता की आर्थिक ताकद?’ म्हळसा तालुक्यात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू, राजकीय पक्षांची कसोटी
Purandar ZP Election 2026: पुरंदरमध्ये ‘महायुती’चे नवे समीकरण: शिवतारे-जगताप एकत्र येणार?
म्हसळा तालुक्यात अनेक इच्छुक उमेदवार हे ग्रऊंड लेव्हलवर काम करणारे, प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत. यातील अनेकांनी यापूर्व लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम काम केले आहे. तरीही केवळ आर्थिक पाठबळ कमी असल्याने मुख्य राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. म्हसळा शहराच्या नाक्या-नाक्यांवर सध्या याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
तालुक्यात राजकारणी आणि समाजसेवकांना निवडणूक लढवण्यासाठी लागणारा मोठा निधी उभा करता येईल, असे ठोस उत्पन्नाचे सधन उपलब्ध नाहीत. त्यातच, ‘आमचे साहेब किंवा पक्षप्रमुख यावेळी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च करण्यास फारसा रस दाखवत नाहीत’, अशी खंत काही इच्छुक उमेदवारांकडून दबक्या आवाजात व्यत्त केली जात आहे. यामुळे नाव नोंदवण्यासही अनेक जण धजावत नसल्याचे समजते.
एकीकडे जनसंपर्क असलेले कार्यकर्त आहेत, तर दुसरीकडे निवडणुकीचा अवाढव्य खर्च, अशा परिस्थितीत पक्षप्रमुख निष्ठेला आणि कामाला महत्त्व देतात की, आर्थिक सक्षमतेला, यावर म्हसळ्याच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. आता कोणत्या पक्षाचा झेंडा कोणाच्या हाती जातो? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
जि.प. पाभरे गटः समीर बनकर (तालुका अध्यक्ष), महादेव पाटील (माजी सभापती), अनिल बसवत (गण अध्यक्ष) गजानन पाखंड, फाहिज नजीर, लहूशेट म्हात्रे,
पं.स. पाभरे गण (महिला राखीव) श्रीमती चाचले, श्रीमती येलवे.
पं.स. खरसई गणः स्वप्नील बिराडी, अनंत पाटील, मोरेश्वर पायकोली, मधुकर पाटील.
जि.प. पांगलोळी गट (सर्वसाधारण): बबन श्रीपत मनवे (माजी, जि.प. सभापती), महेश शिर्के (मुंबई अध्यक्ष), संतोष उर्फ नाना सावंत (गण अध्यक्ष), अभिषेक भास्कर (दाजी) विचारे, अंकुश खडस (माजी सरपंच).
पं.स. साळविंडे गणः मधुकर गायकर (माजी उपसभापती), महेश घोले, सतीश शिगवण.
पं.स. पागलोळी गण श्रीमती प्रियांका प्रसन्न निबरे (माजी सरपंच, खामगाव).
जि.प. पाभरे गटः अकमल कादिरी.
जि.प. पागलोळी गटः रवींद्र लाड (माजी उपसभापती).
जि.प. पाभरे गट हेमंत अनंत नाक्ती