दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
दातांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्ती सतत काहींना काही करत असते. प्रत्येक व्यक्तीचे हास्य हे त्याचे व्यक्तिमत्त्वाचा दर्शवते.चारचौघांमध्ये आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी दात देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा दातांवर साचून राहिलेल्या पिवळेपणामुळे महिलांसह पुरुषांचा आत्मविश्वास देखील कमी होऊन जातो. दातांची योग्य पद्धतीने काळजी न घेणे, दातांवर साचून राहिलेला पिवळा थर, तोंडातील दुर्गंधी, अस्वच्छ हिरड्या., किडलेले दात इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे दातांसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आहारात सतत होणारे बदल, दारू, तंबाखू, सिगारेट इत्यादी पदार्थांच्या अतिसेवनामुळे दातांचे आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
चारचौघांमध्ये हसताना किंवा बोलताना तोंडातून येणाऱ्या घाण वासामुळे हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटू लागते. अशावेळी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र फारकाळ या ट्रीटमेंटचा प्रभाव दातांवर टिकून राहत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दातांवरील पिवळा थर आणि दात स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास दातांवर साचून राहिलेला पिवळेपणा कमी होऊन दात चमकदार आणि सुंदर दिसतील.
चवीला आंबट गोड असलेली स्ट्रॉबेरी दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामुळे दात स्वच्छ होतात आणि चमकदार दिसतात. यासाठी स्ट्रॉबेरीचे दोन तुकडे करून एक तुकड्यावर पांढरे मीठ घेऊन दातांवर हलक्या हाताने चोळा. याशिवाय स्ट्रॉबेरीची पेस्ट तयार करून त्यात मीठ मिक्स करून दातांवर लावू शकता. त्यानंतर दात ब्रशच्या साहाय्याने घासून घ्या. हा उपाय नियमित केल्यास दातांवर साचून राहिलेला पिवळेपणा कमी होईल आणि दात स्वच्छ दिसतील.
दातांसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सफरचंद सायडर व्हिनेगरचा वापर करावा. यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होईल आणि दात स्वच्छ दिसतील. सफरचंद सायडर व्हिनेगर दातांसाठी नैसर्गिक पांढरे करणारे एजंट म्हणून काम करते. याशिवाय या पदार्थाचा आवश्यकतेप्रमाणे वापर करावा. जास्त प्रमाणात वापरू नये. एक कप पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगर टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेल्या मिश्रणाने दात स्वच्छ करा. यामुळे दातांमधील कीड देखील नष्ट होईल आणि दात स्वच्छ दिसतील.
सतत अॅसिडिटी होते? ‘या’ वेळी चुकूनही करू नका फळांचे सेवन, शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी वाटीमध्ये मीठ घेऊन त्यात थोडस मोहरीचे तेल टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेलं मिश्रण दातांवर चोळून नंतर ब्रशने दात घासून घ्या. या पद्धतीने दात स्वच्छ केल्यास दातांवर साचून राहिलेला पिवळा थर निघून जाईल आणि दात स्वच्छ राहतील. हा उपाय आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करून पहा.