Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमकदार दातांसाठी महागड्या ट्रीटमेंट करत असाल तर थांबा! ‘हा’ घरगुती उपाय केल्यास दातांवरील पिवळेपणा कायमचा होईल नष्ट

दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी कायमच महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे दात स्वच्छ होतात आणि दुर्गंधीपासून सुटका मिळते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 09, 2026 | 05:30 AM
चमकदार दातांसाठी महागड्या ट्रीटमेंट करत असाल तर थांबा! 'हा' घरगुती उपाय केल्यास दातांवरील पिवळेपणा कायमचा होईल नष्ट

चमकदार दातांसाठी महागड्या ट्रीटमेंट करत असाल तर थांबा! 'हा' घरगुती उपाय केल्यास दातांवरील पिवळेपणा कायमचा होईल नष्ट

Follow Us
Follow Us:

दातांवर पिवळेपणा वाढण्याची कारणे?
दात स्वच्छ करण्यासाठी उपाय?
दातांना कीड लागण्याची कारणे?

शरीराच्या स्वच्छतेप्रमाणे दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा फार आवश्यक आहे. कारण दातांमध्ये वेदना किंवा कीड लागत नाही, तोपर्यंत दातांच्या स्वच्छतेकडे आणि दातांच्या समस्यांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. दातांवर वाढलेला पिवळेपणा, दात किडणे, दातांवर पांढरा थर जमा होणे, हिरड्यांमध्ये खड्डे पडणे इत्यादी समस्या वाढू लागतात. चहा, कॉफी, तंबाखू, स्मोकिंग आणि ओरल आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे दातांमध्ये अस्वच्छता वाढते आणि दातांच्या समस्या वाढतात. दातांवर साचून राहिलेल्या पिवळ्या थरामुळे काहीवेळा चारचौघांमध्ये हसताना किंवा बोलताना सुद्धा लाजिरवण्यासारखे वाटते.(फोटो सौजन्य – istock)

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

दातांवर वाढलेला पिवळा किंवा पांढरा थर कमी करण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट करण्याचा पर्याय निवडला जातो. पण वारंवार दातांच्या स्वच्छतेसाठी महागड्या ट्रीटमेंट करणे फायद्याचे नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ स्वयंपाक घरात कायमच उपलब्ध असतात. दातांच्या स्वच्छतेसाठी कायमच महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय सुद्धा करून पाहावेत. यामुळे पिवळेपणा कमी होण्यासोबतच दात पांढरेशुभ्र होतील.

दातांवर पिवळेपणा कशामुळे वाढतो?

जीवनशैलीत होणारे, वारंवार चहा किंवा कॉफीचे सेवन, कमी पाणी पिणे, गुटखा, स्मोकिंग आणि योग्य पद्धतीने ब्रश न करणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे दातांवर पिवळा किंवा पांढरा थर वाढू लागतो. यामुळे तोंडाला दुर्गंधी सुद्धा येते. त्यामुळे दातांच्या वरच्या भागावर पिवळा थर म्हणजे प्लॅक जमा होण्यास सुरुवात होते. हा थर ब्रश केल्यानंतर काही वेळासाठी निघून जातो. मात्र पुन्हा एकदा दात पिवळे दिसू लागतात.

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी उपाय:

दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी बाजारातून कोणतेही चूर्ण विकत आणण्याची अजिबात आवश्यकता नाही. घरात असलेले शुद्ध मोहरीचे तेल आणि सैंधव मीठ हे दोन खूप प्रभावी आहेत. वाटीमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यात चिमूटभर बारीक वाटलेले सैंधव मीठ घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून बोटांच्या मदतीने दातांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि हलक्या हाताने घासून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करून घ्या. सैंधव मिठामध्ये नैसर्गिकरीत्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात तर मोहरीचे तेल हिरड्या मजबूत करण्यास मदत करते. यामुळे हिरड्या मजबूत राहतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दात पिवळे होण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: चहा-कॉफीचे अतिसेवन, धूम्रपान, तंबाखू, दातांची योग्य स्वच्छता न राखणे आणि दातांवर प्लाक किंवा टार्टर जमा होणे यामुळे दात पिवळे दिसू शकतात.

  • Que: घरगुती उपायांनी दातांचा पिवळेपणा पूर्णपणे दूर होतो का?

    Ans: घरगुती उपायांमुळे वरवरचे डाग काही प्रमाणात कमी होऊ शकतात; मात्र टार्टर किंवा दातांचा नैसर्गिक रंग बदलल्यास केवळ घरगुती उपायांनी तो पूर्णपणे दूर होईलच असे नाही.

  • Que: दात चमकदार ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: दिवसातून दोन वेळा फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने ब्रश करणे, फ्लॉस करणे आणि नियमित दंत तपासणी करणे उपयुक्त ठरते.

Web Title: Try this home remedy to permanently eliminate yellow stains from your teeth care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Bright teeth
  • teeth home remedies
  • teeth problems

संबंधित बातम्या

Gums Health: ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतंय? जाणून घ्या त्यामागची गंभीर कारणे
1

Gums Health: ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतंय? जाणून घ्या त्यामागची गंभीर कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.