केसांमधील दुर्गंधी घालवण्यासाठी फळांच्या सालीचा वापर करा
सर्वच ऋतूंमध्ये केसांची योग्य काळजी घेतली नाहीतर केस खराब होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्रतेचा परिणाम केसांवर दिसून येतो. या दिवसांमध्ये केस चिकट आणि तेलकट होतात. केसांमध्ये ओलावा तसाच राहतो. या ओलाव्यामुळे केस कितीही स्वच्छ केले किंवा कितीही शॅम्पू लावले तरीसुद्धा केस लगेच चिकट आणि कोरडे होऊन जातात. केसांमध्ये घाम तसाच साचून राहिल्यामुळे केसांमधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. केसांमध्ये दुर्गंधी येऊ लागल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होते. केस मोकळे ठेवून कुठेही जाता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या फळांच्या सालींचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमच्या केसांमधील दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल. तसेच तुमचे केस चमकदार आणि सुंदर दिसतील.(फोटो सौजन्य-istock)
लिंबाच्या रसात असलेले विटामिन सी केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे केसांमधील दुर्गंधी निघून जाईल. यासाठी केस धुवण्याच्या पाण्यात अर्धा वाटी लिंबाचा रस टाका. या पाण्याचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांमध्ये दुर्गंधी येणार नाही. लिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे केसांमधील दुर्गंधी घालवण्यासाठी मदत करतात.
हे देखील वाचा: कढीपत्त्याचा चहा पिण्याचे काय आहेत फायदे?
टी ट्री ऑइलच्या वासामुळे केसांमधील दुर्गंधी निघून जाईल. हे तेल जंतुनाशक असल्यामुळे केसांमधील कोंडा सुद्धा निघून जाण्यास मदत होईल. टी ट्री ऑइल टाळू निरोगी ठेवण्याचे काम करते.त्यामुळे शॅम्पूने केस स्वच्छ करण्याआधी केसांना टी ट्री ऑइल लावावे त्यानंतर केस स्वच्छ धुवावे.
गुलाब पाण्याच्या वापर त्वचेसह केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केला जातो. शँम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुतल्यानंतर गुलाबजलचा स्प्रे करावा. यामुळे केसांमधील दुर्गंधी निघून जाऊन केस स्वच्छ आणि सुंदर दिसतील.
हे देखील वाचा: पावसाळ्यात गर्भवतींनी घ्या अशी काळजी!
केसांच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी आलं पुदिन्याच्या पाण्याने केस स्वच्छ धुवावे. यामुळे केस गळतीच्या समस्यांपासून आराम मिळतो. केस धुवण्याच्या पाण्यात आलं पुदिन्याचा रस टाकावा.