चमकदार त्वचेसाठी या पद्धतीने करा मधाचा वापर
मागील अनेक वर्षांपासून सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी मधाचा वापर केला जात आहे. मधामध्ये असलेले गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी प्रभावी ठरते. मधाचा वापर औषधी पदार्थ म्हणूनसुद्धा केला जातो. यामुळे सर्दी, खोकला दूर होण्यासोबतच इतर समस्यांपासून सुद्धा आराम मिळतो. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. पण काही महिला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय करण्याऐवजी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे काहीकाळ त्वचा खूप सुंदर आणि टवटवीत दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा काळी आणि निस्तेज होऊन जाते. शिवाय वातावरणातील गारव्यामुळे त्वचा कोरडी पडते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले लोशन किंवा इतर प्रॉडक्ट लावतात. मात्र यामुळे त्वचा अधिक काळ चांगली राहत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी मधाचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. या पद्धतीने मधाचा वापर केल्यास त्वचेवरील ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, पिगमेंटेशन निघून जाऊन त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी मधाचा वापर कसा करावा.
मधाचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा आतून उजळदार होण्यास मदत होते. शिवाय यामुळे त्वचेवरील टॅनिंग निघून जाते. त्वचेवर मधाचा वापर करण्यासाठी वाटीमध्ये 1 चमचा मध घेऊन त्यात 2 ते 3 चमचा बटाट्याचा रस टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस टाका. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर १० मिनिटं मसाज करा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये ओठ मोठ्या प्रमाणावर कोरडे होऊन जातात. ओठ कोरडे झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष दिले नाहीतर ओठांमधून रक्त येऊ लागते. त्यामुळे कोरड्या ओठांची काळजी घेण्यासाठी मधाचा वापर करा. वाटीमध्ये १ चमचा मध घेऊन त्यात १ चमचा पिठीसाखर मिक्स करा. तयार केलेले मिश्रण ओठांना लावून हलक्या हाताने व्यवस्थित मसाज करा. यामुळे कोरड्या ओठांची समस्या कमी होईल आणि ओठ गुलाबी सुंदर दिसू लागतील. त्यानंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुवा.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
अनेकांना नाकावर आणि कपाळावर सतत व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स येतात. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी टोमॅटोचे दोन तुकडे करून त्यावर मध ओतून तांदळाच्या पिठामध्ये बुडवून त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा स्वच्छ होईल आणि तुम्ही अधिक सुंदर दिसाल. पिगमेंटेशन, डेड स्किन घालवण्यासाठी मध आणि टोमॅटोचा वापर करावा. यामुळे त्वचा स्वच्छ होते.