चमकदार त्वचेसाठी खोबरेल तेलात मिक्स करा हे पदार्थ
सर्वच महिलांना नेहमी तरुण आणि सुंदर दिसायचं असतं. महिला सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेसमास्क लावणे तर कधी फेशिअल करून घेणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण काहीवेळ केमिकल ट्रीटमेंटचा परिणाम त्वचेवर चुकीचा होतो. त्वचा सुंदर दिसण्याऐवजी खराब आणि कोरडी होऊन जाते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. शिव्या त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. वाढत्या वयानुसार त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. पण तरुण दिसण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या अँटी-एजिंग क्रीम्स आणि लोशनचा वापर करतात. मात्र यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम्सचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या वस्तू त्वचेची गुणवत्ता टिकवून ठेवून त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वयाच्या 60 मध्ये तरुण दिसण्यासाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांच्या वापरामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसाठी खोबरेल तेल आणि कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेलमध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. शिवाय यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात कोरफड जेल मिक्स करून त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं ठेवून नंतर त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. कोरफड जेल त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते. शिवाय यामुळे त्वचा थंड आणि मुलायम होते.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मधाचा वापर त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो. यामध्ये आढळून येणारे गुणधर्म त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्याचे काम करते. त्यामुळे २ चमचे खोबरेल तेलात मध मिक्स करून त्वचेवर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होईल. या मिश्रणाचा त्वचेवर वापर केल्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल.