हिवाळ्यात अशा पद्धतीने घ्या नखांची काळजी
सर्वच महिलांना लांब आणि सुंदर नखं हवी असतात. नखांमुळे हातांच्या सौंदर्यात वाढ होते. नखं सुंदर दिसण्यासाठी महिला नखांवर नेलपेंट लावतात. यामुळे हात अधिक सुंदर आणि उठावदार दिसतात. पण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्वचा कोरडी पडल्यानंतर नखांच्या आजूबाजूची त्वचा कोरडी होऊन जाते, ज्यामुळे हळूहळू नखं सुद्धा निस्तेज आणि कमकुवत होतात. नखं नाजूक होऊन सतत तुटू लागतात. वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासोबतच त्वचा, केस आणि नखांचे आरोग्यसुद्धा बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात नखांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे नखांची त्वचा स्वच्छ आणि मऊ राहील.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सुंदर नखांसाठी महिला मेनिक्युअर करून घेतात. पण मेनिक्युअर जास्त काळ टिकून राहत नाही. उन्हात गेल्यानंतर टॅनिंगमुळे हळूहळू त्वचा निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये लांब नखं सहज तुटून जातात. त्यामुळे काही महिला नखांची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले तेल किंवा इतर क्रीम्स लावल्या जातात. पण त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे नखांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा नैसर्गिक रित्या निरोगी राहण्यास मदत होते.
नखांच्या निरोगी आरोग्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. बेकिंग सोड्यात असलेले गुणधर्म नखं स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट नखांवर लावून व्यवस्थित चोळून घ्या. नखांवर हलक्या हाताने मसाज केल्यानंतर नखं पाण्याने स्वच्छ करा. यामुळे नखांची त्वचा मऊ होईल आणि नखं सतत तुटणार नाहीत. हा उपाय केल्यामुळे हिवाळ्यात नखांची चांगली वाढ होईल आणि नखं सुंदर दिसतील.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जात आहे. खोबरेल तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होते. वातावरणातील गारव्यामुळे नखं सतत तुटू लागतात. अशावेळी नखांना बदाम आणि खोबरेल तेलाने मसाज करावा. यामुळे तुमची नखं तुटणार नाहीत. नखांची योग्य वाढ होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
विटामिन सी युक्त लिंबू त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. लिंबाचा वापर केल्यामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते. शिवाय यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात पाणी मिक्स करा. पाण्यात १५ मिनिटं हात तसेच बुडवून ठेवा. त्यानंतर पाण्याने हात स्वच्छ करा. यामुळे निस्तेज झालेली नखं स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतील.