Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कागदात गुंडाळलेला वडापाव-भजी खाताय? कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण

पेपरमधून अनेक पदार्थ बांधून दिले जातात आणि त्याचे आपण सहजपणे सेवन करतो. मात्र वृत्तपत्राच्या शाईतील धातू अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि अनेक आजारांना सहज आमंत्रण मिळते, कसे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 15, 2025 | 07:11 PM
वृत्तपत्रात गुंडाळलेले पदार्थ खाल्ल्यास नक्की काय होते (फोटो सौजन्य - iStock)

वृत्तपत्रात गुंडाळलेले पदार्थ खाल्ल्यास नक्की काय होते (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

शाळेतील तसेच ऑफ़िसच्या डब्यातील पदार्थ , चपात्या, रस्त्यावरील खाद्य पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्र, प्लास्टिक, ॲल्युमिनीयम, फॅाईलमध्ये गुंडाळले जातात. त्याचा खाद्यपदार्थांवर काय परिणाम होतो याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे वृत्तपत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये अतिशय घातक असे केमिकल असतात. जे बायोएक्टिव्ह असल्याने आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खास करुन पोटाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण होतो. 

कसा होतो परिणाम 

प्रिंटिंगच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा वेळी कागदात अन्न बांधून ठेवल्यास ते रसायन अन्नाच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.  FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कागदावर जीवाणू, विषाणू देखील मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू, विषाणू अन्नात जाऊन त्या आहाराचा तुमच्या आरोग्यावर गंभीर आजार होऊ शकतो. 

हाडांचा सांगडा बनवेल अ‍ॅल्युमिनिअममध्ये शिजलेले अन्न, कोणते मेटल ठरेल बेस्ट?

काय सांगते संशोधन 

अनेकदा डब्यात दिली जाणारी चपाती, सॅंडविच, तसेच रस्त्यावरील पदार्थ पॅक करण्यासाठी प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातूनही घात रसायनं अन्नामध्ये उरतात, त्यामुळे यातील आरोग्याला हानी पोहोचू शकते.  इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स यामध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, अ‍ॅल्युमिनियम फॉइलमधून वेगवेगळ्या उत्तेजकांमध्ये, विशेषतः डिस्टिल्ड वॉटरमध्ये तसेच अम्लीय आणि अल्कधर्मी द्रावणात बाहेर पडतात. अन्नात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढताे म्हणून त्यातील पदार्थ खाणे टाळले पाहिजे. 

कागदातील खाणे ठरेल जीवघेणे

वर्तमान पत्रात बांधलेले खाद्यपदार्थ खाणे अनेक प्रकारे जीवघेणं ठरू शकतं. कारण वर्तमानपत्रातील शाईमध्ये मल्टिपल बायोअ‍ॅक्टिव मटेरिअल असते. ज्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. ही शाई शरीरात गेल्यावर कॅन्सरसह इतरही जीवघेणे आजार बळावू शकतात अशी माहिती फूड अथॉरिटीने दिली आहे.

प्लास्टिक घटकदेखील टाळावे 

आपण आपल्या दैनंदिन दिनचर्यात बहुतांश वेळा पॅकेज केलेले अन्नाचा वापर करतो आणि त्यामुळे सुरक्षित, ताजे व गरम अन्नाचे सेवन करता येते म्हणून ते चांगले असा भ्रम आपल्या मनात असतो. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण बहुतांश खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये प्लास्टिकचे घटक आणि घातक रसायने वापरलेली असतात, जे अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि कर्करोगासारख्या इतर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात.

वर्तमानपत्रे हे अन्न पदार्थ पॅकेजिंग म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली नाहीत. त्यांचे उत्पादन आणि हाताळणी फूड-ग्रेड पॅकेजिंग मटेरियल्समाणेच स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन करत नाहीत. त्यामुळे, त्यांचा वापर करणं म्हणजे आरोग्याला धोका निर्माण करणं होय.

Cervical Health: निरोगी गर्भधारणेसाठी गर्भाशय निरोगी असणे गरजेचे, जागरुकता महिन्यात जाणून घ्या महत्त्व

डॉक्टरांनी सांगितले कारण 

डॉ. ज्योती मेहता, रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट (टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, तळेगाव) सांगतात की, रस्त्यावरच्या गाड्यांवर विकले जाणारे खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून ग्राहकांना दिले जातात. वडापाव, भजी, समोसे, भेळ हे खाद्यपदार्थ पेपरमध्ये बांधून विकले जातात. पण वर्तमानपत्रासाठी वापरण्यात येणारी शाई पोटात गेल्यास आरोग्याला धोकादायक ठरू शकते. पेपरची शाई, त्यातील रसायने सतत पोटात गेल्यास विविध आजारांना आमंत्रण दिले जाते.

Web Title: Using paper to wrap food an invitation to cancer and other life threatening diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 07:11 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
2

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
3

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत
4

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.