फोटो सौजन्य: iStock
Valentine Week म्हणजेच प्रेमाचा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यातील 7व्या दिवशी म्हणजेच 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. चला या खास दिवसाचे महत्व आणि इतिहास जाणून घेऊया.
सध्या प्रेमाचा आठवडा जोरात सुरु आहे. अनेक जोडपी आनंदाने आणि प्रेमाने प्रपोज डे, टेडी डे, इत्यादी दिवस साजरा करत आहे. या प्रेमाच्या आठवड्यात कित्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवताना दिसतात. तर काही जण ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगतात.
Kiss Day 2025: किस डे का साजरा करतात? जाणून घ्या रोचक तथ्य!
अखेर प्रपोज डे, टेडी डे, हग डे नंतर आता कित्येक जणांचा आवडता दिवस उजाडला आहे. तो दिवस म्हणजे किस डे. यादिवशी अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीला किस करत असतात. काही जण किसिंग हे अश्लील कृती मानतात. तर काही जण किसिंगला अश्लील कृती न मानता ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे असे मानतात. खरंतर ‘किस डे’ हा दिवस जोडप्यासाठी खूप खास असतो. चला या खास दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊयात.
दरवर्षी व्हॅलेंटाईन वीकच्या सातव्या दिवशी म्हणजेच १३ फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. हा दिवस व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी साजरा केला जातो.
किस डे कधी आणि कोणी साजरा करायला सुरुवात केली याबद्दल अचूक माहिती उपलब्ध नाही. परंतु, त्याची लोकप्रियता 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात दिसून आली होती. पॉप संस्कृतीत व्हॅलेंटाईन डेच्या वाढत्या ट्रेंडमुळे, किस डे या आठवड्याचे एक प्रमुख आकर्षण बनले आहे. किसमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अधिक जवळ येतात, ज्यामुळे तुमच्या नात्यात आपुलकीची भावना निर्माण होते.
अरे देवा! Trump च्या एका निर्णयामुळे वाढणार HIV Infection, 6 पट वाढू शकतो धोकादायक Virus
नावाप्रमाणेच किस डे हा तुमच्या जोडीदारासोबतचा प्रेमसंबंध वाढवण्याचा दिवस आहे. तुमच्या जोडीदाराला प्रेमळ किस देऊन, तुम्ही तुमचे नाते केवळ मजबूत करत नाही तर ते स्पेशल आहे असे दाखवून देतात. हा दिवस तुमच्या नात्याला प्रेम, उत्कटता आणि आपुलकीने भरतो. किस हे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, जो काहीही न बोलता तुमच्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. यामुळे तुमचे नाते अधिक बंध मजबूत होतो आणि जवळीकतेची भावना निर्माण होते.
प्रेमाच्या आठवड्यातील इतर सर्व दिवसांप्रमाणे, तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करता. व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संपूर्ण दिवस वेळ घालवू शकता. या दिवशी तुम्ही डेट्सवर जाऊ शकता, तुमच्या घरी आरामात तुमचे आवडते चित्रपट पाहू शकता, तुमचे आवडते जेवण बनवू शकता, एकमेकांना भेटवस्तू देऊ शकता.