Celebrate Happy Kiss Day 2025 (फोटो सौजन्य: istock)
फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या व्हॅलेन्टाईन्स वीकला आता सुरुवात झाली आहे. या प्रेमाच्या आठवड्याची जोडपे फार आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवसांत लोक आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदारासमोर व्यक्त करतात तर काही आपल्या प्रेमाची कबुली देतात. प्रेमाचा हा सप्ताह नात्यांमध्ये मजबुती आणण्याचे काम करत असतो. या सप्ताहातील आता काही दिवस उलटले असून यातील किस डे उद्यावर आला आहे. दरवर्षी 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. पाश्चात्य संस्कृतीत एकमेकांना किस करून हा दिवस साजरा केला जातो. यातून दोन व्यक्ती एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात.
या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना किस करत एकमेकांप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करतात. यातून पार्टनरप्रति असलेले प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेहभावना प्रकट होते. हे तर झालेच पण तुम्हाला माहिती आहे का किस डेची सुरुवात कशी झाली आणि तो का साजरा केला जातो? जर नसेल तर हा खास दिवस साजरा करण्यामागचे कारण काय आहे ते येथे जाणून घ्या.
Hug Day History & Significance 2025: विशेष दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
किस डेचा इतिहास?
किस डे जोडप्यांसाठी खूप खास दिवस मानला जातो. असे म्हटले जाते की, 6 व्या शतकात फ्रान्समध्ये जोडपे एकमेकांशी नृत्य करून आणि शेवटी नृत्य संपल्यानंतर किस करून त्यांचे प्रेम व्यक्त करायचे. असेही म्हटले जाते की, रशियामध्ये लग्नाच्या वेळी शपथ घेताना किस करण्याची प्रथा होती. त्याच वेळी, रोममध्ये, एखाद्याला शुभेच्छा देण्यासाठी किस करण्याची पद्धत होती. हळूहळू ही परंपरा जगभर पसरली आणि जगभरातील देशांनी ती आत्मसात केली. तथापि, याची लोकप्रियता 20 व्या शतकाच्या शेवटी अधिक दिसून आली. पॉप संस्कृतीत व्हॅलेंटाइन डेच्या वाढत्या ट्रेंडमुळे, किस डे हे प्रमुख आकर्षण बनले. आपल्या जोडीदाराला जवळ आणणे आणि आपलेपणाची भावना वाढवणे हा यामागचा उद्देश होता.
Hug Day 2025: प्रिय व्यक्तींना का मारावी ‘मिठी’, Hug करण्याचे अफलातून फायदे; का साजरा करतात Hug Day
किस डेचे महत्त्व?
किस डे ही केवळ एक तारीख नाही तर आपल्या प्रियजनांसोबत आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. एक साधे किस देखील व्यक्तीच्या हृदयाच्या जवळ आणण्यात महत्वाची भूमिका बजावते. याद्वारे तुम्ही तुमच्या मनातील भावना काहीही न बोलता समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकता. यामुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते मजबूत होते आणि जवळची भावना निर्माण होते. त्यामुळे या किस डे निमित्त तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा आणि तुमच्या नात्यात नवीन बहार आणा.