HIV संक्रमणावर डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाचा काय होईल परिणाम (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
एचआयव्ही (ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) हा एक अतिशय धोकादायक विषाणू आहे. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून यावर उपचार शोधत आहेत. जगभरात याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोमवार, १० फेब्रुवारी रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या एड्स एजन्सीच्या (UNAIDS) प्रमुखांनी इशारा दिला की जर अमेरिकेचा पाठिंबा संपला आणि त्याची त्वरीत भरपाई केली गेली नाही तर २०२९ पर्यंत HIV infection ६ पट वाढू शकते. ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण जाऊ शकतात आणि एड्सचे अधिक धोकादायक प्रकार उद्भवू शकतात असा धक्कादायक अहवाल आता समोर आलाय.
HIV हा असा आजार आहे जो एकेकाळी प्रचंड पसरला होता. याबाबत अधिकाधिक जागरूगता केल्याने आता याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र ट्रम्पल यांच्या एका निर्णयामुळे हा आजार पुन्हा सहापट वाढण्याची भीती आता निर्माण झाली आहे. नक्की हा निर्णय काय आहे आणि एचआयव्ही संक्रमणावर याचा कसा परिणाम होऊ शकतो याबाबत आपण अधिक माहिती घेऊया.
जगभरात AIDS चे किती रूग्ण
UNAIDS च्या कार्यकारी संचालक विनी ब्यनिमा यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, गेल्या काही वर्षांत HIV संसर्ग कमी झाला आहे. २०२३ मध्ये फक्त १३ लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी १९९५ च्या तुलनेत ६०% कमी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच घोषणा केली आहे की अमेरिका हा देश ९० दिवसांसाठी सर्व परदेशी मदत म्हणजेच निधी थांबवेल. जर असे झाले तर एड्स रोखण्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसू शकतो.
जर अमेरिकेने मदत करणे थांबवले तर काय होईल?
बियान्यामा म्हणाले की, असा अंदाज आहे की २०२९ पर्यंत एचआयव्हीचे ८७ लाख नवीन रुग्ण आढळू शकतात. यामुळे ६३ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ज्यामुळे ३४ लाख मुले अनाथ होऊ शकतात. ते म्हणाले, जर अमेरिकन सरकारने आपला निर्णय बदलला नाही तर परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. यामुळे आजार वाढतील आणि अधिक मृत्यू होऊ शकतात.
UNAIDS आवाहन
संयुक्त राष्ट्रांच्या एड्स प्रमुखांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना अचानक निधी थांबवू नका असे आवाहन केले कारण यामुळे अनेक आफ्रिकन देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. या कारणास्तव, केनियातील एका काउंटीमधून ५५० एचआयव्ही कामगारांना काढून टाकण्यात आले आहे. इथिओपियातील हजारो लोकांना कामावर न येण्यास सांगण्यात आले आहे. ज्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना साथीच्या आजारावर लक्ष ठेवण्यात अडचणी येत आहेत. एचआयव्ही रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये चालवल्या जाणाऱ्या ९०% मोहिमा अमेरिकेतून येतात. त्यामुळे हा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भिवंडी बनले नवीन HIV हॉटस्पॉट! 90 टक्के वेश्या पॉझिटिव्ह, हे आकडे वाचून व्हाल चकित!
काय म्हणाले ट्रम्प