
आता हे ब्रेस्ट पंप नक्की आहेत तरी काय आणि याचा वापर कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊयात.
प्रसुतीनंतर शरीरातील हार्मोनल बदल होतात आणि आई बाळाला स्तनपान करते. पण अनेक महिलांना दूध पाजताना खूप वेदना होतात. अशावेळी बाळाला दूध पाजताना ब्रेस्टपंप एक चांगला पर्याय आजची आई वापरु शकते. याच्या सहाय्याने आई बाळाला दूध पाजू शकते आणि स्तनांना होणारा त्रास याने कमी होतो.
Manually Breastpump, Electric Breast Pump असे मार्केटमध्ये विविध प्रकारचे ब्रेस्टपंप आहेत.Manually Breastpump हा तुम्हाला हाताने वापरावा लागतो. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागते. दुसरा पंप आहे त्याला Electric Breast Pump असं म्हणतात. याला एक मोटर जोडलेली असते. याच्या सहाय्याने बाटलीमध्ये दूध जमा होतं. Manual Breastpump पेक्षा हा पंप वापरणं जास्त सोयीचं आहे. यानंतर सगळ्यात छोटा आणि जास्त वापरण्यात येणारा पंप म्हणजे वायरलेस पंप. हा पंप अगदी छोटा असला तरी वापरणं सोपं पडतं. हा इलेक्ट्रिक असल्याने याला चार्ज करणं देखील गरजेचं आहे. याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात दूध काढून तुम्ही ठेऊ पण शकता.
ब्रेस्टपंपचे जसे फायदे पण हे तेव्हाच शक्य आहे त्याची स्वच्छता राखली जाते. वापरल्यानंतर हा ब्रेस्टपंप तुम्ही स्वच्छ धुवून वाळवून घ्यायला पाहिजेत. नाहीतर हे बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. ब्रेस्टपंप वापरवा की वापरु नये याबाबत तुम्ही स्वत: कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचं मत आधी जाणून घेणं गरजेचं आहे.