Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातपाय पडतील निळे शरीराचाही होईल सांगाडा; शाकाहारी खाणाऱ्यांना अधिक धोका, Vitamin B12 युक्त 5 पदार्थ खायलाच हवेत

शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी शाकाहारी जेवण चांगले असूनही आहारात पूर्ण कोबालामिन नसते. ज्यामुळे सायनोसिस रोग होऊ शकतो. अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त व्हिटॅमिन बी 12 देणारे 5 पदार्थ खा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 25, 2025 | 08:03 AM
विटामिन बी१२ ची कमतरता असेल तर काय करावे

विटामिन बी१२ ची कमतरता असेल तर काय करावे

Follow Us
Follow Us:

निरोगी राहण्यासाठी फळे, भाज्या आणि सुकामेवा खाणे महत्वाचे आहे. यापासून आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने मिळतात. हे पोटासाठी देखील खूप चांगले आहेत. शाकाहारी आहार घेणाऱ्यांमध्ये हृदयरोग, मधुमेह आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी असल्याचे दिसून येते. परंतु या लोकांना कोबालामिनची कमतरता नावाच्या समस्येचा धोका जास्त असतो.

रक्त निर्मितीसाठी कोबालामिन आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे मजबूत शरीर कमकुवत, कोरडे आणि बारीक होऊ शकते. यामुळे मेंदूची काम करण्याची क्षमताही कमी होते आणि हाडांची ताकदही कमी होऊ लागते. बहुतेक भाज्या, धान्ये आणि फळांमध्ये हे पोषक तत्व नसते आणि जरी ते असले तरी ते खूप कमी प्रमाणात उपलब्ध असते.

अशक्तपणा व्यतिरिक्त, कोबालामिनची कमतरता देखील दृष्टी कमी करू शकते. गर्भवती महिलांना औषध घेऊन ही आवश्यकता पूर्ण करावी लागते, अन्यथा नवजात बाळाला अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्हाला हे सर्व धोके टाळायचे असतील तर व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध असलेले पदार्थ खा. या जीवनसत्वाचे दुसरे नाव कोबालामिन आहे. यासंदर्भात डॉक्टर माधव भागवत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

काळंनिळं पडेल शरीर

लाल रक्तपेशींचे कार्य रक्तात ऑक्सिजनचे संचारण करणे आहे. या पेशी बनवण्यासाठी शरीराला कोलोबामाइनची आवश्यकता असते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सायनोसिस होऊ शकतो. यामुळे हात, नखे आणि त्वचा निळी होऊ लागते. याचा त्रास तुम्हाला होऊन गंभीर आजाराचा सामनाही करावा लागू शकतो

गाईच्या दुधाचा उपयोग

नियमित गाईचे दूध प्यावे

गाईचे दूध पिण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला दुधाची अ‍ॅलर्जी नसेल, हृदयरोग नसेल, कोलेस्ट्रॉल नसेल आणि तुमची शारीरिक हालचालही चांगली असेल तर तुम्ही दररोज दूध पिणे हे फायदेशीर ठरते. विटामिन बी१२ च्या कमतरतेसाठी तुम्ही नियमित दुधाचे सेवन करावे. एफडीएच्या मते, फुल क्रीम दुधात व्हिटॅमिन बी१२ च्या दैनंदिन गरजेच्या ४६ टक्के असते. त्यामुळे याचे नियमित सेवन करणे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरते

फोर्टिफाईड न्यूट्रिशनल यीस्ट

तुमच्या शाकाहारी आहारात हे पदार्थ कधीही समाविष्ट करायला विसरू नका. हे पूर्णपणे शाकाहारी आहे आणि व्हिटॅमिन बी १२ ने समृद्ध आहे. फक्त २ चमचे पौष्टिक यीस्ट आवश्यकतेपेक्षा ७ पट जास्त पोषण प्रदान करते. या पावडरमधून प्रथिने, खनिजे आणि इतर जीवनसत्त्वे देखील मिळतात.

शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता शरीर काढेल पोखरून, सकाळी शरीरात दिसतात ‘ही’ गंभीर लक्षणे

अंड्याचा करा वापर

आहारात अंड्याचा समावेश करून घ्यावा

काही जण वार पाळतात अथवा काही जणांना अंडे खाऊन चालत नाही. मात्र ज्यांना खायला मिळते त्यांनी दररोज २ उकडलेले अंडे खावेत. केवळ या प्रमाणात, ४६ टक्के गरज पूर्ण होईल. त्यात व्हिटॅमिन बी२, प्रथिने, बायोटिन, कोलीन असते. स्नायूंच्या बळकटीसाठी आणि मेंदू जलद काम करण्यासाठी हे आवश्यक आहेत. अंड्यामुळे तुमच्या शरीरातील विटामिन बी१२ ची असणारी कमतरता कमी होण्यास मदत मिळते

विटामिन बी12 मुळे शरीराच्या नसा झाल्या आहेत निर्जीव? मग आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

कलेजी वा प्राण्यांचे मांस

प्राण्यांच्या मांसामध्ये व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण सर्वाधिक असते. जे लोक प्राण्यांचे यकृत आणि मूत्रपिंड खातात त्यांना याची काळजी करण्याची गरज नाही. ते पचवण्यासाठी तुम्हाला फक्त शारीरिक हालचाल वाढवावी लागेल आणि कोलेस्टेरॉल वाढू देऊ नये. अनेकांना कलेजी खायला आवडते. आपल्या आहारामध्ये याचा समावेश करून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते 

खाऱ्या पाण्यातील मासे

खाऱ्या पाण्यामधील मासे खावेत

सार्डिन हे लहान आणि मऊ हाडे असलेले खाऱ्या पाण्यातील मासे आहेत. हे खाल्ल्याने कोबालामिनची आवश्यकता पूर्ण होऊ शकते. हे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडचादेखील एक चांगला स्रोत आहे, जे जळजळ नियंत्रित करू शकते. यामुळे तुम्ही आपल्या आहारामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने ठराविक प्रमाणात खाऱ्या पाण्यातील माशांचा समावेश करून घेऊ शकता

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Vitamin b12 deficiency risk high in vegetarian best cobalamin 5 foods to eat regularly health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 08:03 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
3

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.