सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांचे अतिरिक्त वजन वाढलेलं दिसतं. वजन कमी करण्यासाठी लोक ना ना प्रकारचे उपाय करून पाहतात. जास्त वजनामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. शरीरातील हट्टी चरबी (Fat) काढून टाकण्यासाठी बरेच लोक कठीण आहाराचे पालन करतात. पण तो आहार दीर्घकाळ पाळणे कठीण होते.
अनेकांना माहित नसलेले अनेक भारतीय मसाले (Spices) आहेत, जे नियमितपणे खाणे खूप फायदेशीर आहे. यात वजन कमी करणे देखील समाविष्ट आहे. त्या मसाल्यांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात ते सर्व मसाले मिळतील. विशेष म्हणजे हे मसाले वजन कमी करण्यासही मदत करतात. जाणून घेऊयात या मसाल्यांविषयी,
काळी मिरी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच सर्वात महत्वाचे त्यामध्ये फायबर देखील आहे. काळ्या मिरचीचा चहा वजन नियंत्रणात चांगला काम करतो. काळी मिरीमध्ये पिपेरिन हे एक संयुग असते जे चयापचय कार्य सुधारते आणि शरीराला चरबी पचवण्यास मदत करते.
धन्यामध्ये पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड असते. तसेच जीवनसत्त्वे ए, के आणि सी असतात. धने पचन आणि वजन कमी करण्यास मदत करते. दोन चमचे धने रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गरम करून गाळून घ्या. आपण जर नियमितपणे धन्याच्या पाण्याचे सेवन केले तर शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास नक्की मदत होईल.
जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते. जिरे खाणे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. पोटाची चरबी कमी करण्याची हे खूप जास्त फायदेशीर आहेत. जिरे कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. जिरे पाणी हे एक उत्कृष्ट पेय आहे जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि पित्त उत्सर्जनास प्रोत्साहन देते, यकृताचे आरोग्य सुधारते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाण्याचे नक्की सेवन करा.
कोणत्याही भाजीची चव वाढवण्यासाठी चिमूटभर हिंग पुरेसे असते. मात्र, हिंगामध्ये हजारो गुण आहेत. हे चांगले चयापचय, रक्तदाब नियंत्रण आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठी औषधासारखे काम करते. कारण त्यात कार्मिनेटिव्ह, अँटी मायक्रोबियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. अर्धा चमचा हिंग गरम पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल.