Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लठ्ठपणामुळे पोटावर साचलेत चरबीचे टायर, बाबा रामदेवांचा रामबाण पदार्थ करेल तुम्हाला Slim Trim

शरीरावर वाढलेले अतिरिक्त वजन आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर आहारात लिंबू पाण्यासोबतच भोपळ्याच्या रसाचे सुद्धा सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 14, 2025 | 03:28 PM
लठ्ठपणामुळे पोटावर साचलेत चरबीचे टायर, बाबा रामदेवांचा रामबाण पदार्थ करेल तुम्हाला Slim Trim

लठ्ठपणामुळे पोटावर साचलेत चरबीचे टायर, बाबा रामदेवांचा रामबाण पदार्थ करेल तुम्हाला Slim Trim

Follow Us
Close
Follow Us:
  • लठ्ठपणा वाढण्याची कारणे.
  • लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे किती दिवसांमध्ये होते वजन कमी

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. शरीरात लठ्ठपणा वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. हात, मांड्या आणि शरीराच्या इतर अवयवांवर अनावश्यक चरबीचे थर साचून राहण्यास सुरुवात होते, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. याशिवाय शारीरिक हालचाली, व्यायाम किंवा ध्यान न केल्यामुळे वजन वाढू लागते. वजन वाढल्यानंतर महिलांसह पुरुषसुद्धा आहार तज्ज्ञांकडूनअनेक वेगवेगळे डाएट घेतले जाते. पण चुकीचा आणि संतुलित डाएट फॉलो न केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. वजन कमी करण्यासाठी महिला युट्युबवरील व्हिडिओ पाहून काहींना काही उपाय करतात. मात्र तरीसुद्धा कोणताही फरक शरीरात दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

रक्तात वाढलेल्या इंचभर साखरेमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका! जीवनशैलीतील ‘या’ सवयी वाचवतील जीव

वजन वाढल्यानंतर ते कमी करणे अतिशय कठीण होऊन जाते. याशिवाय शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागते. चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन, जंक फूड आणि औषधांच्या दुष्परिणामांमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेला सोपा उपाय सांगणार आहोत. या पदार्थाच्या सेवनामुळे शरीरात वाढलेले अतिरिक्त वजन कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.

वजन वाढण्याची कारणे:

  • जंक फूडचे अतिसेवन
  • व्यायामाचा अभाव
  • पाण्याची कमतरता
  • अपुरी झोप, इत्यादी अनेक गोष्टींच्या चुकीच्या परिणामामुळे शरीराचे अतिरिक्त वजन वाढू लागते.

वजन कमी करण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेला सोपा उपाय:

वाढलेले वजन कमी करताना इतर कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. वजन कमी करताना पौष्टिक आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावे. रात्रीच्या जेवणात भात किंवा चपाती खाऊ नये. वजन कमी करताना नियमित भोपळ्याच्या रसाचे सेवन करावे. तसेच रात्री ७ वाजण्याच्या आधी जेवण करावे. जेवल्यानंतर १ तासाने पाणी प्यावे. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.

Diabetes: रोज 1 ऐवजी 2 केळी खाल्ल्यास गडबडेल Sugar Level, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक माहिती

वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी त्रिफळा कोमट पाण्यात घालून ठेवाव्यात. त्यानंतर रात्री त्रिफळाच्या पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच वाढलेले वजन सुद्धा कमी होण्यास मदत होईल. याशिवाय सकाळी दुधाचा चहा पिण्याऐवजी आलं आणि लिंबूच्या चहाचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय दालचिनीच्या पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यास महिनाभरात सकारात्मक परिणाम दिसून येतील. निरोगी आरोग्यासाठी सकाळी लवकर उठणे अतिशय महत्वाचे आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

वजन कमी करण्यासाठी व्यायाम किती महत्वाचा आहे?

वजन कमी करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे.चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे यांसारख्या व्यायामाचा आहारात समावेश करा.स्नायू तयार करण्यासाठी आणि चयापचय (metabolism) वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यासाठी किती वेळ लागतो?

वजन कमी करण्याची प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळी असते.तुमच्या आहारात बदल आणि व्यायामामुळे हळू हळू वजन कमी होते.एका महिन्यात 1-2 किलो वजन कमी करणे सुरक्षित मानले जाते.

वजन कमी करण्याचा आहार कसा असावा?
तुम्ही संतुलित आहाराचे पालन करू शकता, ज्यामध्ये भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, दुबळे मांस आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असेल.प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये, अल्कोहोल आणि चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन टाळणे महत्वाचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Weight loss baba ramdevs food is said to mix with water to reduce fat on the stomach due to obesity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • lose weight
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
1

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी
2

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट
3

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट

सकाळी उठल्यानंतर नियमित करा अंजीरच्या पाण्याचे सेवन, वयाच्या १०० व्या वर्षीसुद्धा हाडे राहतील मजबूत
4

सकाळी उठल्यानंतर नियमित करा अंजीरच्या पाण्याचे सेवन, वयाच्या १०० व्या वर्षीसुद्धा हाडे राहतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.