रक्तात वाढलेल्या इंचभर साखरेमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका! जीवनशैलीतील 'या' सवयी वाचवतील जीव
जीवनशैलीतील बदल, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. कारण रक्तातील साखर वाढल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे केवळ मधुमेहाचं नाहीतर हृदयावर सुद्धा गंभीर परिणाम दिसून येतो. हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते.शरीरात अतिशय किंचित वाढलेला मधुमेह हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो.(फोटो सौजन्य – istock)
रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. हृदयाचे आरोग्य कायम निरोगी ठेवण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सवयींमुळे आरोग्याला अनेक फायदे होतील.
शरीरात वाढलेला मधुमेह शरीरातील इतर नाजूक अवयवनांवर गंभीर परिणाम करतो. याशिवाय मज्जातंतू किंवा नसांचे मोठे नुकसान होते. हृदयाच्या गतीवर नियंत्रण ठेवणारे तंतू जास्त प्रभावित झाल्यामुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात आणि रक्तवाहिन्यांना हानी पोहचते. ज्यामुळे कोणत्याही क्षणी कार्डियाक अरेस्ट येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते.
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे शरीराच्या रक्तदाबावर गंभीर परिणाम दिसून येतात. उच्च रक्तदाब वाढल्यामुळे नसांना हानी पोहचते. कोणत्याही क्षणी रक्तवाहिन्या फुटू शकतात. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाच्या गतीवर तणाव येतो. तसेच मधुमेह वाढल्यानंतर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकते, ज्यामुळे हार्ट ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो.
मधुमेह झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. मधुमेह वाढल्यानंतर आहारात सुद्धा बदल करावा. डॉक्टरांनी दिलेली औषध, इन्सुलिन योग्य वेळी घेणे आवश्यक आहे. याशिवाय आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. आहारात मेथी दाणे, कमी मीठ, साखरेचे व प्रोसेस्ड अन्न टाळणे इत्यादी गोष्टी नियमित फॉलो केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. पुरेशी झोप आणि मद्यपान न केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.
नसांमधील कमजोरी म्हणजे काय? शरीरातील नसा मजबूत ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील ‘हे’ उपाय
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह म्हणजे शरीरात रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी सामान्यपेक्षा जास्त असणे. जेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करत नाही, तेव्हा रक्तातील साखर वाढते.
मधुमेहासाठी जोखीम घटक काय आहेत?
लठ्ठपणा किंवा जास्त वजन.शारीरिक हालचालींचा अभाव (निष्क्रिय जीवनशैली).उच्च रक्तदाब. कुटुंबात मधुमेहाचा इतिहास.
मधुमेहाचे निदान कसे केले जाते?
रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी उपवास रक्तातील साखर चाचणी, यादृच्छिक रक्तातील साखर चाचणी आणि HbA1c चाचणी केली जाते.