Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

जगभरातील प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा आणि राहणीमान वेगळे आहे. काही देशांतील नियम आणि प्रथा तर आपल्याला ऐकूनही आश्चर्य वाटू शकते. अशाच काही अनोख्या गोष्टी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 30, 2026 | 08:04 AM
Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:
  • सिंगापूरमध्ये च्युइंगमबाबत आहेत कडक नियम
  • जपानमध्ये ऑफिसमध्ये झोपण्याची ‘इनेमुरी’ परंपरा
  • फ्रान्सपासून उत्तर कोरियापर्यंत लग्न आणि हेअरस्टाईलबाबत अनोखे नियम
प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा, लोकांचे राहणीमान, परंपरा आणि काही अनोख्या गोष्टी पाहायला मिळतात, ज्या आपल्यासाठी नवीन आणि थक्क करणाऱ्या ठरतात. आपल्याला सामान्य वाटणाऱ्या गोष्टी इतर देशांत वेगळ्या प्रकारे पाहिल्या जाऊ शकतात तर इतर देशात पाळल्या जाणाऱ्या परंपरा आपल्याला अचंबित करणाऱ्या ठरु शकतात. आज आपण या लेखात जगातील अशाच काही अजब-गजब परंपरा आणि देशातील मान्यता जाणून घेणार आहोत ज्याविषयी जाणून घेताच तुम्ही अवाक् झाल्याशिवाय राहणार नाहीत.

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

सिंगापूर – च्युइंगम खाण्यास मनाई

लहानपणी च्युइंगम तुम्ही अनेकदा खाल्लं असेल. लहान मुलांचं हे आवडीचं स्नॅक्स आहे. पण सिंगापूर एक असे ठिकाण आहे जिथे या च्युइंगमला खाण्यावर मनाई केली जाते. या देशात च्युइंगमच्या विक्रिवर, आयातीवर तसेच च्युइंगम तयार करण्यावर १९९२ पासून बंदी घालण्यात आली आहे.

जपान – ऑफीसमध्ये निवांतपणे झोपा

भारतात जर कोणता कर्मचारी आपल्या कामावर झोपला तर त्याला अनप्रोफेशनल आणि कामचुकार मानलं जातं. पण जपान एक असा देश आहे जिथे ऑफीसमध्ये झोपणं चुकीचं नाही तर चांगलं मानलं जातं. जपानी संस्कृतीत, दुपारच्या झोपेला ‘इनेमुरी’ (inemuri) म्हणतात, जो एक पारंपरिक विधी आहे. जपानी दृष्टिकोनातून, ऑफीसमध्ये झोपणे म्हणजे व्यक्तीने इतके काम केले आहे की त्याची झोप पूर्ण झाली नाही असा अर्थ होतो.

फ्रांस – पार्टनरच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत विवाह

कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या फक्त आठवणी आपल्यासोबत राहतात. पण फ्रांसमध्ये एक कायदा आहे ज्यानुसार पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्यासोबत लग्न केले जाऊ शकते. तिथे याला ‘मॅरेज पोस्ट्यूम’ (marriage postume) असे म्हटले जाते.

चीन – मॅरेज मार्केट

ज्याप्रकारे भारतात आजही अरेंज मॅरेजला जास्त महत्त्व दिले जाते, त्याचप्रमाणे जपानमध्येही जुन्या परंपरांना जास्त प्राधान्य दिले जाते. चीनमध्ये लग्न जुळवण्यासाठी घरी कांदेपोह्याचा कार्यक्रम आयोजित केला जात नाही तर पार्कमध्येच सार्वजनिकरित्या आयोजित केलेल्या मॅरेज मार्केटला भेट दिली जाते. येथील शंघाई मॅरेज मार्केट प्रचंड लोकप्रिय आहे.

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

उत्तर कोरिया – सरकारच्या मर्जीने हेअरस्टाईल

सरकारच्या कठोर निर्बंधांसाठी उत्तर कोरिया जगभरात लोकप्रिय आहे. इथे नागरिकांवर बऱ्याच सामान्य गोष्टींसाठीही कठोर नियम लादण्यात आलेले आहे. सांगितले जाते की, या देशात सरकारकडून साधारण १५ ते २८ हेअरस्टाईल्सची निवड करण्यात आली ज्याचा वापर नागरिक करु शकतात. म्हणजेच सरकारने मान्यता दिलेल्या या निवडक हेअरस्टाईलमधूनच नागरिकांना आपली हेअरस्टाईल करावी लागते.

 

Web Title: Weird and unique traditions rules around the world singapore japan france china north korea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • Weird News

संबंधित बातम्या

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
1

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
2

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
3

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?
4

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.