
फोटो सौजन्य - Social Media
अनेक जण साखर खाणे पूरबपणे सोडून देतात. साखरेचे थोडे तरी प्रमाण असलेले खाद्यपदार्थ अगदी स्पर्शही करत नाहीत. कारण साखरेचे अतिसेवन शरीरसाठी हानिकारक असते. याने शरीराला मधुमेहासारख्या वज्राची लागण होण्याची अफाट शक्यता असते. या खतरनाक आजारापासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी अनेक जण साखर खाणे सोडतात. परंतु, साखरेप्रमाणे जर आपण मीठ खाणे सोडून दिले तर शरीरात काय बदल घडतील? शरीराला याचा फायदा होईल कि अनेक नुकसान भोगावे लागतील? चला तर मग जाणून घेऊयात.
हे देखील वाचा : पुरूष नात्यात का देतात धोका? फक्त लैंगिक संबंधच नाही तर ही आहेत 5 धक्कादायक कारणं
जर तुम्ही साखरेप्रमाणे मीठही सोडून देण्याचा विचार करताय. तर थांबा! मीठाचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी तर भयंकर आहेच. त्याचबरोबर मीठाचे काहीच सेवन नाही करणे देखील आरोग्याला खूप महागात पडू शकते. अगोदरच खूप महागाई आहे, त्यामध्ये कुणाला मीठ सोडून देण्याचे उपाध्याप करावेसे वाटत असेल तर त्याने हे करण्याआधी दहा वेळा विचार करावा नाही तर ही गोष्ट आरोग्याला आणि बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी खिशाला दोघांना खूप महागात पडेल.
थकावट होणे ही अतिशय सामान्य स्थिती आहे. आपल्या अळणी जीवनात चव आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मीठाला राम राम केले तर आपल्या शरीरामध्ये सतत एक थकवा जाणवेल. शरीरातील सोडिअमची पातळी घसरू शकते. तसेच इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स बिघडतो, त्यामुळे चक्कर येते. शरीरातील रक्त दबावावर याचा परिणाम होत असतो. रक्त दबाव कमी झाल्याने शरीरातील वॉटर रिंटेंशन कामामध्ये अडथळा येतो. उलटी सारखी समस्या जाणवते. सोडिअमच्या घसरत्या पातळीमुळे मसल्स क्रॅम्प्स येत असतात. याचे प्रमाण वाढत जाते.
या सर्व त्रासामुळे, मीठाचे सेवन पूर्णपणे बंद करणे फार चुकीचे आहे. फक्त चवीसाठी नव्हे तर शरीरातील अनेक आरोग्यविषयक फायद्यांसाठी मीठाचे सेवन करणे गरजेचे आहे. महत्वाची बाब अशी आहे कि त्याला काही मर्यादा असणे अनिवार्य आहे. कोणतीचीही गोष्ट मर्यादेमध्ये केलेली चांगली असते. जेव्हा एखादी गोष्ट मर्यादेच्या बाहेर केली जाते, तर त्याचा त्रास आपल्या पाठीवर येणे अत्यंत साहजिक बाब आहे.