फोटो सौजन्य - Social Media
पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित ‘दि एआय धर्मा स्टोरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक थरारक चित्रपट असून, आजच्या काळातील तंत्रज्ञानाच्या परिणामांवर भाष्य करतो. विशेष म्हणजे मराठीत AI वर आधारित हा पहिलाच सिनेमा आहे. या विषयावर आधारित सिनेमा मराठी सिनेसृष्टीत पहिले कधी पाहिला गेला नाही. काही तरी नवीन असल्यामुळे, या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता लागून आहे.
हे देखील वाचा : ‘वॉर 2’ मध्ये किंग खानची एंट्री? हृतिक, ज्युनियर एनटीआरसह शाहरुखची दिसणार एकत्र केमिस्ट्री!
पुष्कर जोगने स्वतःच्या अनुभवाशी हा चित्रपट कसा जोडतो, याचा खुलासा केला आहे. पुष्कर जोग म्हणतो, ” आज समाजात डीप फेकचे प्रमाण फोफावतेय. मी स्वतः एका मुलीचा वडील असल्याने माझ्याही मनात तिच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा कायम असतो. माझ्यासाठी माझ्या मुलीचा जीव खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा मी स्वतःशी जोडू शकतो. चित्रपटात धर्माची व्यक्तिरेखा साकारताना, मी स्वतःच्या भावना त्यात ओतल्या आहेत. एक वडील आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी काय करू शकतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एक थरारक अनुभव देईल, तसेच एक वडील मुलीची भावनिक नातेही या निमित्ताने अनुभवयाला मिळेल.”
चित्रपटात पुष्करने धर्मा या वडिलांची भूमिका साकारली आहे, जो आपल्या मुलीच्या जीवासाठी लढा देतो. हा लढा एकाच वेळी तांत्रिक आव्हानांसमोर उभा असलेला आणि भावनिक दृष्टिकोनातून गुंफलेला आहे. पुष्कर म्हणतो, “धर्माच्या व्यक्तिरेखेत मी स्वतःच्या भावना ओतल्या आहेत. एक वडील आपल्या मुलीच्या रक्षणासाठी काय करायला तयार असतो, हे या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.” या चित्रपटात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम दाखवण्यात आले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह, त्याचे दुष्परिणाम कसे टाळता येतील, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुष्कर जोगसोबत स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
हे देखील वाचा : Bhool Bhulaiyaa 3: ‘जाना समझो ना’ मध्ये कार्तिक आणि तृप्तीची दिसली रोमँटिक केमिस्ट्री, चाहत्यांचा मिळाला प्रतिसाद!
बियु प्रोडक्शन निर्मित आणि तेजल पिंपळे यांनी निर्मिलेल्या या चित्रपटाचा प्रेक्षकांना उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘दि एआय धर्मा स्टोरी’ २५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.