Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थोडं वजन वाढलं तर काय फरक पडतो? खरं तर ‘थोडं’ वजनच ठरू शकतं आजारांचं मूळ!

वजन वाढणं ही फक्त दिसण्याची समस्या नाही, तर शरीरात चालणाऱ्या गंभीर बदलांचा इशारा आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणाव नियंत्रणाने आपण मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगापासून स्वतःचे रक्षण करू शकतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 17, 2025 | 06:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अनेकदा आपण विचार करतो, “अरे थोडं वजन वाढलंय, काही हरकत नाही.” पण खरं सांगायचं तर ही निष्काळजी वृत्ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. शरीरावर साचलेली ही “थोडीशी चरबी” केवळ बाह्य स्वरूपावर परिणाम करत नाही, तर आतून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देते. वाढलेलं वजन हे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांचं प्रमुख कारण मानलं जातं, मात्र त्याचसोबत ते कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचं मूळ देखील ठरू शकतं. कारण शरीरात जास्त चरबी साचली की दोन घातक प्रक्रिया सुरू होतात — हार्मोन्सचं असंतुलन आणि क्रॉनिक इन्फ्लेमेशन. चरबीच्या पेशी म्हणजे फॅट सेल्स शरीरात एस्ट्रोजेन आणि इन्सुलिन सारखे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार करतात. या हार्मोन्सचा अतिरेक शरीरातील कर्करोगी पेशींना वाढण्यासाठी पोषण देतो.

दिवाळीच्या आधी करा शरीराचीही आतून ‘स्वच्छता’, पंचकर्मने करा Body Detox, बाबा रामदेवांकडून जाणून घ्या फायदे

त्यामुळे वजन जितकं वाढतं, तितकं ट्यूमर पेशी वाढण्याचं प्रमाणही जास्त होतं. त्याशिवाय, चरबी वाढल्याने शरीरात सूक्ष्म स्वरूपाची सूज कायम राहते, जी दीर्घकाळ टिकल्यास “क्रॉनिक इन्फ्लेमेशन” मध्ये बदलते. ही स्थिती आपल्या सामान्य पेशींचं नुकसान करते आणि कर्करोगी पेशींसाठी वाढीस पोषक वातावरण तयार करते. वजन वाढणं ही एक सायलेंट प्रोसेस असते; बाहेरून काही दिसत नाही, पण आतून शरीरात मोठे बदल घडत असतात.

चरबी साचल्याने पेशींच्या रचनेत हळूहळू बदल होतात आणि त्या असामान्य वर्तन करू लागतात, जे पुढे आजाराचं रूप घेतात. त्यामुळे ‘थोडं वजन वाढलंय, काही होत नाही’ असा विचार करणे चुकीचं आहे. यावर उपाय म्हणून संतुलित आहार घ्यावा, तळलेले आणि प्रोसेस्ड पदार्थ टाळावेत, दररोज किमान अर्धा तास चालणे, योग किंवा हलका व्यायाम करावा. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळोवेळी आपला BMI तपासावा आणि तणाव कमी करावा, कारण स्ट्रेसमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

राजस्थानचा फेमस पदार्थ डाल ढोकाळी कधी चाखली आहे का? चवीसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही डिश

शेवटी, मोटापा म्हणजे केवळ सौंदर्याशी संबंधित समस्या नसून, तो शरीराच्या आत सुरू असलेल्या गंभीर बदलांचा इशारा आहे. योग्य वेळी नियंत्रण घेतलं, तर आपण मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या घातक आजारांपासून स्वतःचं रक्षण करू शकतो.

Web Title: What difference does it make if you gain a little weight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • obesity

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.