इंग्रजी माध्यमात शिकवलं जाणाऱ्या मराठीत यामध्ये वर्णमाला म्हणजे काय हे सुद्धा सांगितलं जात नाही. तर आजचा आपला विषय असणार आहे की वर्णमाला म्हणजे नक्की काय? आपल्या मुलांना जर मुळापासून मराठी शिकवायचं असेल तर मराठीमध्ये नक्की वर्ण किती आहेत ते आधी समजून घेतलं पाहिजे. मराठी वर्णमालेत एकूण बावन्न वर्ण आहेत. आधुनिक मराठी व्याकरणानुसार यामध्ये चौदा स्वर अर्थात बारा मूळ अधिक दोन इंग्रजीतून आलेले शब्द म्हणजेच अ आणि ऑ. दोन स्वरादि आणि चौतिस मूळ व्यंजनं आणि अधिक चार संयुक्त व्यंजनं मिळून ही संख्या होते बावन्न.
मराठीतली वर्णमाला कोणती ?
पूर्वीच्या वर्णमालेत अट्ठेचाळीस वर्ण होते. मात्र आता ही संख्या बावन्न मानली जाते. आता आपण वर्णमालेचा सविस्तर तपशील जाणून घेऊया. स्वर आहेत ते म्हणजे कोणते? तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, लू, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ आणि औ. दोन स्वरादि म्हणजेच अम आणि आहा. ज्याला आपण अनुस्वार आणि विसर्ग असे म्हणतो. छत्तीस व्यंजने जी आहेत क ते ज्ञ पर्यंत. पण काही व्याकरणात मूळ पण काही व्याकरणात मूळ व्यंजनं चौतीस मानून संयुक्त व्यंजनं वेगळी मानली जातात आणि अशी मिळून एक वर्णमाला तयार होते. ळ हे मराठीतील विशिष्ट व्यंजन मानले जाते आणि क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन म्हणून वर्णमालेत जोडली गेली आहेत. मग आहे की नाही आपली मराठी भाषा सुफळ संपूर्ण !






