जेवल्यानंतर छातीत जळजळ आणि अन्न अडकल्यासारखे का वाटते? पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय
Acidity: कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा जेवणाच्या वेळा चुकून जातात. जेवणाच्या वेळेत बदल झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. जंक फूड, तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे छातीत तीव्र जळजळ, खाल्लेले अन्न किंवा द्रव पदार्थ अचानक उलटून घशात येणे, तोंडात पिवळसर, आंबट किंवा कडू चव पसरणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे ऍसिडिटी वाढते आणि विविध लक्षणे दिसू लागतात. घशात जमा होणारे पिवळसर पाणी म्हणजे पोटात तयार झालेले पित्त. पोटात पित्ताचे प्रमाण वाढल्यानंतर अन्नपदार्थ अडकल्यासारखे वाटतात. त्यामुळे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते.(फोटो सौजन्य – istock)
जास्त तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, चॉकलेट, कॉफी व कॅफिनयुक्त पेये, मद्यपान, पुदिना, संत्री, आंबट फळे, टोमॅटो आणि सोडा असलेल्या पेयांचे उपाशी पोटी सेवन करू नये. याशिवाय रात्रीच्या जेवण आणि झोपेमध्ये ३ तासांचे अंतर असणे फार आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी सतत घशात आंबट पाणी येत असेल तर झोपताना डोक्याकडील आणि छातीकडील भाग थोडा उंचावून झोपल्यास वाढलेली ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. तसेच गरम पाणी करून त्यात बडीशेप टाकून पाणी तयार करावे. नियमित बडीशेपचे पाण्याचा समावेश केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ पचन होतील.
खाल्लेले अन्नपदार्थ घशात किंवा अन्ननलिकेमध्ये अडकून राहिल्यास ॲसिडिटीचा समस्या नसून शरीरसंबधीत गंभीर आजाराचा धोका असू शकतो. गिळताना वारंवार अन्न अडकून पडणे, गिळताना तीव्र वेदना, झपाट्याने वजन कमी होणे, वारंवार उलट्या होणे, शौचातून किंवा उलटीतून रक्त पडत असेल तर अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. अन्ननलिकेची सूज, अडथळा किंवा इतर गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो.
Diabetes: गोड खात नाही, तरीही शुगर लेव्हल वाढतेय? डायबिटीज कंट्रोलसाठी रोजच्या ‘या’ चुका टाळा
पोटात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी जेवल्यानंतर लगेच झोपू नये. सरळ बसून राहिल्यामुळे किंवा उभे राहिल्यामुळे पोटातील अन्न आणि ॲसिड पुन्हा खाली जाते आणि अपचनाच्या समस्या कमी उद्भवतात. अन्नपदार्थ गिळताना किंवा पाणी पिताना त्रास होत असेल तर पाणी प्यावे. दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. विनाकारण पचन न होणारे पदार्थ ऍसिडिटी वाढून शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. ओव्हर-द-काउंटर, ॲल्जिनेट इत्यादी औषधांचा डॉक्टरांच्या सल्ल्याने समावेश करावा.
Ans: जेवल्यानंतर पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर आल्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. या समस्येला ॲसिड रिफ्लक्स किंवा ॲसिडिटी असे म्हणतात.
Ans: अन्न गिळताना अडचण येणे किंवा छातीत अन्न अडकल्यासारखे वाटणे यामागे ॲसिड रिफ्लक्स, अन्ननलिकेची सूज किंवा अन्ननलिका अरुंद होणे अशी कारणे असू शकतात. वारंवार असा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: होय. जेवल्यानंतर लगेच आडवे झाल्यास पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेवल्यानंतर किमान २-३ तास झोपणे टाळावे.






